थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. या सीझनमध्ये कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करत असाल तर राजस्थान येथील जैसलमेरला या ठिकाणी नक्कीच जा. गोल्डन सिटी म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण तुम्ही कुटुंबासोबत हिवाळ्यात फिरण्यासाठी परफेक्ट आहे. हे शहर आपल्याला राजस्थानच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा झोपसलेल्या आणि रंगांची झलक देते.
जैसलमेरचे नाव इ.स. ११५६ मध्ये शहराची स्थापना करणारे महारावल जैसल सिंग यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हे शहर वाळवंट सफारी आणि जैसलमेर किल्ल्यासाठी ओळखले जाते. हा किल्ला सुवर्णकिल्ला म्हणूनही ओळखला जातो. चला जाणून घेऊया जैसलमेरमध्ये किती दिवस प्रवास करावा आणि कुठे जावे.
कुठे कुठे फिरायला जावे?
ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत तुम्ही या ठिकाणाला भेट देता येते. जैसलमेर किल्ला (जैन मंदिर, महाल, मुसुम, सिटी व्ह्यू पॉईंट), कुलधारा गाव, अमर सागर, सॅम सॅंड टील्स, जैसलमेर वॉर म्युझियम, गदिसर तलाव, पाटों की हवेली आणि नथमल जी की हवेली या ठिकाणांना भेट देता येईल. तुम्ही येथे जीप सफारी, उंट सफारी आणि बोटिंग देखील करू शकता.
आपण खरेदी देखील करू शकता
जैसलमेर हे मिरर-वर्क, भरतकाम केलेले कापड आणि गालिचे, ब्लँकेट, तेलाचे दिवे, विंटेज स्टोनवर्क वस्तू, रंगीबेरंगी कपडे, लाकडी वस्तू, रेशीम कापड आणि चांदीचे दागिने यासाठी ओळखले जाते. जर तुम्ही जैसलमेरला जात असाल तर सदर बाजार, पंसारी बाजार, सीमा ग्राम, गांधी दर्शन आणि माणक चौक या सारख्या बाजारपेठांना भेट देऊन मनसोक्त खरेदी करू शकता.
टूर किती दिवस करायची
दोन तुम्ही आरामात जैसलमेर फिरू शकता. यात बजेट बद्दल बोलायचे झाले तर सोलो ट्रिपकरिता आणि थोडी शॉपिंग करायची असेल तर ८ ते १० हजारांचे बजेट पुरेसे आहे. कुटुंबासोबत जात असाल तर तुमचे बजेट वाढू शकते. तुम्ही ट्रेन किंवा बसने जैसलमेरला जाऊ शकता. रेल्वेने जाणे तुम्हाला स्वस्त प्रवास होऊन जाईल.