Belly fat : पोटावरची चरबी कमी करण्यासाठी सोपा उपाय

| Updated on: Jan 01, 2024 | 8:41 PM

पोटावरची चरबी कमी करणे फार अवघड असते. कितीही व्यायाम केला तर देखील ते लवकर कमी होत नाही. पोटावरची चरबी वाढल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पोटावरची चरबी वाढण्याचं कारण म्हणजे बैठी कामाची पद्धत जी अधिक वजन वाढवते, पोट कमी करण्यासाठी तुम्ही खाली सांगितलेले आसन करु शकता.

Belly fat : पोटावरची चरबी कमी करण्यासाठी सोपा उपाय
Follow us on

मंडुकासनाचे फायदे : बैठी जीवनशैलीमुळे पोट वाढण्याचं प्रमाण आता वाढत आहे. पोटावर जमा झालेली चरबी कमी करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे. बसून काम करावे लागत असल्यामुळे हा त्रास वाढू लागला आहे. अनेक तास आपण एकाच जागी बसून काम करतो. म्हणून पोट वाढत आहेत.  लोक वजन कमी करण्यात गुंतलेले असतात मात्र पोटाची चरबी लवकर कमी होत नाही. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता. आम्ही तुम्हाला असे योग आसन सांगत आहोत, जे केल्याने तुमचे पोट कमी होण्यास मदत होईल. तुम्ही पोट कमी करण्यासाठी मंडुकासन करु शकता. दररोज 10-15 मिनिटे मांडूकासन केल्याने पोटाची चरबी हळूहळू कमी होऊ लागते.

मंडुकासनाचे फायदे काय

मंडुकासनाला बेडूक मुद्रा असेही म्हणतात. मंडुकासन केल्याने पोटाचे स्नायू मजबूत होतात. पोटाची चरबी काढून टाकण्यासाठी हे सर्वोत्तम आसन आहे. मंडुकासन करणे अगदी सोपे आहे. हे आसन कोणीही करू शकतो. जे लोक योगासने करतात ते हे सहजपणे करु शकता. या योगामुळे पोटाच्या समस्याही दूर होतात. यामुळे गॅस, अपचन आणि पोट फुगणे यासारख्या समस्या कमी होतात. मंडुकासन रोज केल्याने पचनक्रिया मजबूत होते. मधुमेही रुग्णही करू शकतात. जाणून घ्या मांडूकासन करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे?

हे सुद्धा वाचा

मंडुकासन करण्याची पद्धत

मंडुकासन करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला एका सपाट जागेवर वज्रासन स्थितीत बसावे लागेल.
आता आपल्या हातांनी मुठी बनवा आणि त्यांना आपल्या नाभीजवळ आणा.
मुठ नाभी आणि मांडीजवळ उभी ठेवा. त्यांना अशा प्रकारे ठेवावे लागेल की बोटे पोटाच्या आतील बाजूस आहेत.
आता दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना शक्य तितके पुढे वाका. छातीला मांड्यांवर विश्रांती देण्याचा प्रयत्न करा.
आता तुम्हाला जास्तीत जास्त दाब देऊन तुमच्या मुठीने नाभीला आतील बाजूस ढकलावे लागेल.
आता डोके आणि मान सरळ समोरच्या दिशेने वळवा आणि हळूहळू श्वास घेण्याचा आणि श्वास सोडण्याचा प्रयत्न करा.
काही वेळ थांबल्यानंतर, आपल्या सामान्य स्थितीत परत या आणि ते पुन्हा करा.
तुम्हाला मंडुकासनाच्या एका फेरीने सुरुवात करावी लागेल