जसजसे एखाद्या व्यक्तीचे वय वाढत जाते तसतसा त्याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावरही दिसून येतो. वाढत्या वयाबरोबर चेहऱ्याची चमक कमी होऊ लागते आणि चेहरा निर्जीव दिसू लागतो. मात्र काही उपाय करून वाढत्या वयातही चेहरा तरुण ठेवता येतो. यासाठी कोणतेही महागडे उत्पादन वापरण्याची ही गरज नाही कारण घरगुती उपचारांद्वारे ही त्वचा सुधारता येते. चेहरा तरुण ठेवण्यासाठी अनेक जण महागड्या उत्पादनांचा वापर करतात. त्यामध्ये रसायने देखील असू शकतात आणि आतून त्वचेचे बरेच नुकसान होऊ शकते.
अशावेळी त्वचेला तरुण ठेवण्यासाठी घरगुती उपाय खूप उपयुक्त ठरू शकतात आणि आज आम्ही तुम्हाला कापूरची एक घरगुती रेसिपी सांगणार आहोत, ज्यामुळे त्वचेला खूप फायदा होऊ शकतो.
आपली त्वचा दीर्घकाळ आनंदी आणि तरुण ठेवायची असेल तर कापूरचा वापर केला जाऊ शकतो.
कापूर बाजारात दोन रुपयांना मिळणार आहे. हा कापूर मुलतानी मातीत मिसळून फेसपॅक तयार करा, ज्याचा फायदा चेहऱ्यावर लावून घेता येईल. मुलतानी माती चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.
त्वचा तज्ञांचे म्हणणे आहे की कापूर त्वचेचे डाग दूर करू शकतो. खोबरेल तेलात कापूर मिसळून चेहऱ्यावर मसाज केल्यास चेहऱ्याची चमक परत येते आणि डागही दूर होतात.
याशिवाय मुलतानी मातीत कापूर मिसळूनही फायदा होऊ शकतो. त्यासाठी मुलतानी माती आणि कापूर गुलाबपाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करावी लागते. यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी यामुळे सुरकुत्या दूर होण्यास मदत होईल आणि काळे डागही दूर होतील.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)