मुंबई: आजची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि वाढते प्रदूषण याचा आपल्या आरोग्यावर तसेच केसांवर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे तुमचे केस पातळ, तुटलेले, पांढरे, कोंडा आणि चिकट दिसतात. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी चहाच्या पत्तीने केस धुण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. चहाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे केसांची चमक टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामुळे तुमच्या केसांना बळ मिळते. यासोबतच केसांची वाढ होण्यासही मदत होते, तर चला जाणून घेऊया चाय पत्ती हेअर मास्क कसा बनवावा.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)