मुंबई : सध्या बरेच लोक शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत. वेगवेगळे उपचार घेऊन देखील त्यांची ही समस्या दूर होताना दिसत नाही. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, शरीरात रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी द्राक्ष हे अत्यंत फायदेशीर आहेत. द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते. दररोज एक ग्लास द्राक्षांच्या रसामध्ये 3 चमचे मध घालून हे रस प्यायल्याने आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता नेहमीसाठी दूर होईल. (If the body is deficient in blood then eating grapes is beneficial)
-जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर द्राक्षे त्यांच्यासाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. द्राक्षे खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. उच्च रक्तदाब असेल तर आठवड्यातून तीन ते चार दिवस द्राक्षे खा, याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
-द्राक्षात ग्लूकोज, मॅग्नेशियम सारख्या अनेक घटक असतात. द्राक्षे अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. त्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. प्रामुख्याने टीबी, कर्करोग आणि रक्त संसर्ग यासारख्या आजारांमध्ये फायदेशीर आहे. त्यामुळे ज्या लोकांना हे रोग आहेत त्यांनी जास्तीत-जास्त प्रमाणात द्राक्ष खाल्ले पाहिजेत.
-जगातील बहुतेक मृत्यू हृदयाशी संबंधित आजारांमुळे होतात. म्हणून, हृदयाशी संबंधित रोगांवर उपचार म्हणून द्राक्षे खाल्ली पाहिजेत. काही काळापूर्वी केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की स्तनाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी द्राक्षे खाणे खूप फायदेशीर आहे.
(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)
संबंधित बातम्या :
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Almond Benefits | सोलून खावेत की पाण्यात भिजवून? जाणून घ्या बदाम खाण्याची योग्य पद्धत
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(If the body is deficient in blood then eating grapes is beneficial)