आताच्या रिलेशनशिपमध्ये (relationship) पूर्वीसारखी मजबुती आणि विश्वास दिसून येत नाही. अनेकदा अनेक लोक आपल्या पार्टनरला सहजच धोका देतात आणि समोरच्या व्यक्तीला याबद्दलची माहिती सुद्धा होत नाही. तसेच अनेक जण प्रेम म्हणजे फक्त टाईमपास करत असतात. प्रेमाचे महत्त्व अनेकांना माहिती नाही आणि म्हणूनच अशा वेळी दोन व्यक्तींमधील नाते अनेकदा संपुष्टात येण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. सध्याच्या दिवसांमध्ये अनेकदा आपल्या कानी बातम्या येत असतात की, आपल्या पार्टनरने एकमेकांना धोका दिलेला आहे किंवा आपल्या पार्टनर (partner) से दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध आहे हे शोधून काढण्यासाठी अनेक जण प्रायव्हेट डिटेक्टर ठेवला आहे. रिलेशनशिप चांगले व्हावे असे जर वाटत असेल तर ॲडव्हायझरचा सल्ला अनेकजण घेत असतात. अशातच आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला सहजच माहिती होईल की तुमचा पार्टनर तुम्हाला धोका ( break up) देत आहे की नाही तसेच तुमच्या सोबत कोणत्याही प्रकारची चिटिंग करत तर नाही ना..? त्याबद्दल…
जर तुमच्या पार्टनरमध्ये अशा प्रकारचे काही बदल जाणवले तर याचा अर्थ तुमचा पार्टनर तुम्हाला धोका देत आहे..
कोणताही व्यक्ती आपल्या सवयींना सहजच बदलू शकत नाही. परंतु जर तुमचा पार्टनर त्याच्या सवयी बदलत आहे तर अशावेळी समजून घ्या की तुम्हाला धोका देत आहे. या दरम्यान तुमचा पार्टनर अशा अनेक गोष्टी करू शकतो जे त्यांनी यापूर्वी कधीच केल्या नसतील.
आधी तुमचा पार्टनर वेळेवर घरातून बाहेर जायचा आणि वेळेवरच घरात परत यायचा अनेक वेळा वर्क प्रेशर जास्त असल्याने तुमचा पार्टनर घरातून लवकर निघू शकतो आणि उशिरा सुद्धा घरी परतू शकतो. परंतु असे जर रोजच घडत असेल तर अशा वेळी समजून घ्या काहीतरी गडबड आहे.
अनेक वेळा अनेक ऑफिस मध्ये आपल्या बिजनेस निमित्ताने अनेकांना बिझनेस ट्रीप करण्यासाठी बाहेर जावे लागते. महिन्यातून एक किंवा दोन वेळा घडत असेल तर हे नॉर्मल आहे परंतु जर तुमचा पार्टनर नेहमीच बिझनेसचे नाव करून बाहेर जात असेल तर याचा अर्थ तुमचा पार्टनर तुम्हाला धोका देत आहे.
लग्नाआधी आणि लग्नानंतर काही काळ तुमचा पार्टनर तुम्हाला नेहमी सोबत घेऊन जायचा. परंतु, आता त्याने सगळीकडे तुम्हाला नेणे बंद केलेले आहे आणि कोणत्याच ट्रिपचा प्लॅन करत नसेल तर काहीतरी गडबड आहे असे समजून घ्या आणि त्याचबरोबर तुमच्या पार्टनरला तुम्ही नेहमी सोबत असणे जर आवडत नसेल, नेहमी तो तुम्हाला इग्नोर करत असेल तर म्हणून समजून घ्या काहीतरी बाहेर लफडे आहे तसेच तुमची साथ आता तुमच्या पार्टनरला बोर करत आहे आणि म्हणूनच तुम्हाला कुठेही बाहेर फिरवण्यासाठी तो इच्छुक नाही.
प्रत्येक नात्यामध्ये छोटी मोठी भांडण होत असते आणि काही वेळानंतर या भांडणांमध्ये गोडवा सुद्धा येतो परंतु जर तुमच्या ती भांडणे संपायचे नाव घेत नसतील तर अशा वेळी नात्यात समस्या निर्माण होऊ शकते. भांडण झाल्यावर सुद्धा तुमच्यातील भांडण संपत नसेल. दीर्घ कालावधीसाठी तुम्ही एकमेकांशी बोलत नसेल तर याचा अर्थ तुमचे नाते लवकरच संपुष्टात येणार आहे.
जर तुमचा पार्टनर आता तुमच्या सोबत कोणत्याही प्रकारचा रोमान्स करत नसेल आणि यामुळे वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होत असतील तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत बोलण्याची गरज आहे परंतु या सगळ्या गोष्टी बोलुन सुद्धा बदलत नसतील तर तुमच्या पार्टनर मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बदल जाणवत नसेल तर याचा स्पष्ट अर्थ असा होतो की आता तुमच्या पार्टनरला तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रस नाही.
जर अशा प्रकारच्या घटना सुद्धा घडत असतील तर समजून घ्या पार्टनर तुमचा धोका देत आहे..
खर्चाबद्दल चर्चा न करणे
सोशल मीडियावर सिक्रेट काउंट बनवणे
क्रेडिट कार्डचे बिल लपविणे
आपल्या लूक वर पहिल्यापेक्षा अधिक लक्ष देणे
अचानक जिम जॉईन करणे
मोबाईल फोनवर एखाद्याचा अननोन नंबर मिस कॉल असणे
फोनमधील लॉक किंवा पासवर्ड लावणे
खोटे बोलणे
तुम्ही जर त्याला सरप्राईज दिले तर रागवणे
सिक्रेट फोन नंबर ठेवणे इत्यादी
अशा प्रकारच्या घटना जर तुमच्या सोबत घडू लागतील तर याचा अर्थ तुमचा पार्टनर तुम्हाला धोका देत आहे आणि भविष्यात तुमचे नाते लवकरच संपुष्टात येणार आहे असे संकेत सुद्धा तुम्हाला मिळते.