मुंबई : उपवासामुळे शरीरातील अशुद्धता दूर होते. शरीराची पचनप्रणाली देखील सुधारते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. पण जेव्हा आपण गर्भवती महिलांबाबत विचार केला जातो. त्यांनी उपवास करणं योग्य आहे की नाही, असा प्रश्न पडतो. बऱ्याच लोकांचे म्हणणे असते की, गर्भवती महिलांनी उपवास पकडून नये. गर्भवती महिलांना उपवास पकडायचा असेल तर त्यांनी सर्वात अगोदर डाॅक्टरांशी चर्चा करणे योग्य आहे. त्यामधील सहा-सात दिवसांचा उपवास पकडणे तर शक्यतो टाळावे. जर गर्भवती महिला उपवास पकडणार असेल तर खालील टिप्स फाॅलो केल्या पाहिजेत. (If you are fasting during pregnancy, then follow these tips)
-भरपूर पाणी आणि ताज्या फळांचा रस प्या. उपवास सुरू करण्यापूर्वी थोडं जड अन्न खा. ज्यामुळे ते हळूहळू पचेल आणि बऱ्याच काळासाठी ऊर्जा मिळेल.
-कोणत्याही परिस्थितीत निर्जल व्रत करू नका. उपवासादरम्यान दोन ते तीन वेळा दूध प्या, जे शरीरातील कॅल्शियमची आवश्यकता पूर्ण करेल. थकवा येईल असं कोणतंही काम करू नका आणि लांब अंतर देखील चालू नका.
-डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तुम्ही जर उपवास करणार असाल तर काही गोष्टींची काळजी घ्या. सर्वप्रथम केवळ तेच उपवास करा ज्यात फळे, रस किंवा दूध इत्यादी घेण्याची परवानगी आहे आणि त्याचं नियमित सेवन करा.
-रमजानसाठी पौष्टिक इफ्तार म्हणजे संध्याकाळचे जेवण भरपूर कर्बोदकं, खनिजं आणि प्रथिनंयुक्त असावा. अशाप्रकारे सेहर म्हणजे सूर्य उगवण्याआधी आवश्यक पोषक द्रव्ये शरीरास मिळतील.
-चहा आणि कॉफीचे सेवन करू नका ज्यामुळे वारंवार लघवी होऊ शकते आणि डिहाइड्रेशन होऊ शकतं.
संबंधित बातम्या :
Health Care | हवामान बदलतंय! अशाप्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी
Hair Fall | मधुमेहामुळे देखील उद्भवू शकते केस गळती, रक्तातील साखर नियंत्रित करणे आवश्यक!#HairFall | #diabetes | #Health | #HealthCarehttps://t.co/GBfureUNxN
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 27, 2021
(If you are fasting during pregnancy, then follow these tips)