जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो तेव्हा त्याच्यासोबत आपलं अख्ख आयुष्य घालवायचं असतं. अनेक स्वप्न आपण रंगवत असतो. पण काही कारणामुळे तुमचं हे प्रेम लग्नबंधनात अडकत नाही. अशावेळी तुम्ही जगणं सोडत नाही. तर पुढे जाता, दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करता. पण जर लग्नानंतरही प्रियकराची किंवा प्रेयसीची आठवण तुम्हाला येत असेल तर हे बरोबर नाही. अशाने तुम्ही जी नवीन सुरुवात केली आहे त्यात तुम्ही रमत नाही. मग अशावेळी काय करावं. आम्ही तुम्हाला अशा 5 टिप्स देणार आहोत, ज्याने तुम्हाला फायदा होईल.
जेव्हा तुम्हाला सतत एक्ससोबतच्या आठवणी त्रास देत असतात. त्या आठवणी सतत तुम्हाला आठवत असतात. तुम्ही हे सगळं कोणाला सांगू शकतं नाही. अशावेळी तुम्ही त्या एखाद्या कागद्यावर लिहा आणि नंतर आरशासमोर ते सगळं बोला. त्यामुळे तुमच्या मनातील गोष्ट निघून जाते आणि तुमचं मन हलकं होतं.
एक्ससोबत नातं तुटण्यामागचं कारण कायम लक्षात ठेवा. प्रेमाचं नातं हे तुटण्यामागे नक्की काहीही तरी कारण असतं. ते कारण कायम लक्षात ठेवा. कारण ज्या नात्याला भविष्य नाही त्याचा विचार करण्यात अर्थ नसतो. तुटण्यामागे नक्की काहीही तरी कारण असतं. ते कारण कायम लक्षात ठेवा. कारण ज्या नात्याला भविष्य नाही त्याचा विचार करण्यात अर्थ नसतो.
जर तुम्हाला सतत एक्सची आठवण येत असेल तर, तुम्ही नवीन पार्टनरला वेळ देत आहात. तुमच्या पार्टनरसोबत जास्त जास्त वेळ घालवा. त्याच्या आवडीनिवडी समजून घ्या, त्याला आवडेल त्या गोष्टी करा. जर तुम्हाला एक्सची आठवण येत आहे याचा अर्थ तुम्ही तुमच्या पार्टनरला कमी वेळ देत आहात. अगदी एकमेकांमध्ये रमण्यासाठी खास एडवेंचर ट्रिपला जा. त्यातून तुम्हाला एकमेकांसाठी वेळ मिळेल आणि एकमेकांच्या गोष्टी कळतील.
तुम्हाला एखादा छंद असेल तर त्यात मन रमवा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या एक्सला विसरायला मदत होईल. आणि सोबतच तुमचा छंद जोपासला जाईल. एक लक्षात ठेवा कोणाची आठवण कधी तुम्हाला जास्त त्रास देते जेव्हा तुम्ही फ्री असाल तेव्हा म्हणून अशावेळी तुम्ही स्व:तला बिझी ठेवा. तुम्हाला जे आवडतं त्यात मन रमवा.
मैत्री तर प्रत्येक आजाराचं रामबाण औषध आहे. मित्र मैत्रिणींसोबत आपण आपल्या आयुष्यातील अनेक संकट किंवा दुख विसरून जातो. मग अशावेळी एक्सला विसण्यासाठी तुम्हाला मित्र-मैत्रिणी नक्कीच मदत करतील. त्यांना भेटा त्यांच्यासोबत पिक्चर, जेवण्याचा प्लन बनवा. ज्यामुळे तुमचं मन रमेल आणि भूतकाळ तुम्हाला आठवणार नाही.