मुंबई : सध्या हवामानात खूप बदल होत आहेत. सकाळी-संध्याकाळी थंडी आणि दुपारी गर्मी होतेय. जोपर्यंत उन्हाळा सुरु नाही तोपर्यंत हवामानात हे बदल होत राहतील. बदलत्या हवामानात काळजी घेतली पाहिजे. थोडासा बेजबाबदारपणाही तुम्हाला आजारी करु शकतो. यासाठी तुम्हाला काही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. (If you get sick due to the changing environment then follow these tips)
-कडक उन्हात फिरल्यास तुम्ही आजारी पडू शकता. यावेळी शरीर हवामानातील बदलांसाठी अनुकूल नसते. त्यामुळे कडक उन्हामुळे ताप येऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या वातावरणात अधिक वेळ उन्हात जाणे टाळा.
-सर्दी खोकल्यावरील गुणकारी औषध म्हणून प्रचलित आहे. आल्याचा रस व मध सम प्रमाणात बाटलीमध्ये साठवून दोन-दोन चमचे दोन वेळा घेतल्यास सर्दी, खोकला पडसे आणि स्वरभंग बरे होतात. अजीर्ण झाल्यास आल्याच्या रसात लिंबाचा रस व मीठ घालून पाणी प्यावे. आले तोंडात ठेवताच लाळग्रंथी सक्रिय होतात.
-ताप आल्यावर तुळशीचा रस पिल्यानंतर ताप कमी होतो. मलेरीया आणि डेंग्यू झाल्यानंतर ही तुळशीचा रस पिल्यावर आराम मिळतो. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि वारधक्य कमी करण्यासाठी तुळशीचा रस पिल्याने फायदा पोहचेल.
-आता हिटर किंवा ब्लोअरचा वापर करणे बंद केले असेल. हवामानातील सौम्य थंडी आणि गर्मीचा आनंद घ्या. दुपाच्या वेळी अधिक गरम होते तरीही एसी लावू नका. सध्या एसीच्या थंडाव्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. यापेक्षा घरातील खिडक्या दरवाजे उघडे ठेवा आणि ताजी नैसर्गिक हवा घ्या.
संबंधित बातम्या :
Skimmed Milk | स्किम्ड दुधाचे सेवन करताय? थांबा! आधी जाणून घ्या याचे दुष्परिणाम…#SkimmedMilk | #Food | #health | #MILK https://t.co/3kPWs3RUkH
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2021
(If you get sick due to the changing environment then follow these tips)