व्यस्त जीवनशैली असेल तर, ‘या’ गोष्टींचे न चुकता खा, निरोगी राहण्यासोबतच उर्जाही टिकून राहील!

| Updated on: May 27, 2022 | 3:23 PM

व्यस्त जीवनामुळे लोक तणाव आणि अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांनी वेढलेले असतात. अशा परिस्थितीत लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आणि मग त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी व्यस्त जीवनशैली असणाऱयांनी योग्य आहारपद्धती अंवलंबली पाहीजे.

व्यस्त जीवनशैली असेल तर, ‘या’ गोष्टींचे न चुकता खा, निरोगी राहण्यासोबतच उर्जाही टिकून राहील!
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : व्यस्त जीवनामुळे लोक तणाव आणि अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांनी (Physical problems) वेढलेले असतात. अशा परिस्थितीत लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नंतर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा लोक आरोग्याची काळजी घेतात, पण माहितीच्या अभावामुळे तब्येत बिघडत जाते. राहणीमान, खाणे, स्वच्छता याकडे लक्ष देऊन तुम्ही तुमचे जीवन निरोगी बनवू शकता. उत्तम फिटनेस (fitness) असेल तर, तुम्ही अनेक यशोशिखरे चढवू शकतात. परिश्रम करताना शरीराची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे तुमची जीवनशैली सोपी बनवा, अवजड नाही. यंत्रांवर पूर्णपणे विसंबून राहण्याऐवजी स्वतःहून काही काम करा. यामुळे शरीर तंदुरुस्त राहते, त्याचबरोबर तुम्ही मानसिकदृष्ट्याही निरोगी (Mentally healthy) राहाल. निरोगी जीवनशैली ठेवा आणि संतुलित आहार घ्या. यासोबतच वेळोवेळी नियमित तपासणी करून घ्या, जेणेकरून कोणताही आजार तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही.

आरोग्यदायी पदार्थ

कामात व्यस्त असलेल्या बहुतेक लोकांची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी विस्कळीत असतात. वेळेअभावी त्यांना स्वतःची काळजी घेता येत नाही. तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर काही पदार्थांचे सेवन करून, स्वत:ला निरोगी आणि उत्साही बनवता येते. जे लोक कामात किंवा इतर कोणत्याही कारणामुळे व्यस्त असतात त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेता येत नाही. त्यांच्या शरीरात उर्जेची कमतरता असते किंवा रोग होण्याचा धोका वाढतो. जर तुम्हाला व्यस्त राहून स्वतःची काळजी घ्यायची असेल, तर आजपासूनच आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करा.

बाजरी खा

आज प्रत्येकजण गव्हाच्या पिठाची रोटी खातात, कारण आपल्या सर्वांना याची सवय झाली आहे. त्याऐवजी बाजरीच्या पिठाची रोटी बनवून खाऊ शकता. त्याचा फायदा असा आहे की यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते.

ड्रायफ्रूट्स खा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपण दिवसभरात योग्य प्रमाणात पौष्टिक आहार घेतला पाहिजे, परंतु काही लोक व्यस्तेतमुळे ते करू शकत नाहीत. जे लोक सतत व्यस्त असतात ते काजू खाऊ शकतात. त्यांना कॅरी करणेही सोपे आहे आणि त्यांना खाण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता नसते. तुम्ही कीतीही बिझी असलात तरी, ड्रायफ्रुटचे काही तुकडे तोंडात टाकून आपले काम करू शकता.

सत्तू

उन्हाळ्यात आजही खेडे किंवा ग्रामीण भागात सत्तूसोबतचे पाणी प्यायले जाते. उन्हाळ्यात उत्साही राहायचे असेल तर सत्तूपासून बनवलेल्या गोष्टी खा. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दोन चमचे सत्तू पावडर एका ग्लासात टाकून प्या.

फळे आणि भाज्या

व्यस्ततेमुळे जर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष देत नसाल तर आजपासूनच ही सवय बदला. शरीराला पोषक आणि ऊर्जा पुरवण्यासाठी हंगामी फळे खा. करवंद, टिंडे अशा हिरव्या भाज्या दिवसातून एकदा तरी खाव्यात.