Kokum Benefits : कोकम हे असे फळ आहे ज्याचे आपण आपल्या आहारात समावेश करतो. कोकमचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशी आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी देखील कोकमचे फायदे आहेत. कोकममध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक घटक आढळतात जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत. कोकम आपली त्वचा पोषित आणि मुलायम ठेवण्यास मदत करते. कोकम त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. कोकम आपली त्वचा चमकदार ठेवते. कोकम तेल चेहऱ्यावर लावल्यास मुरुम आणि सुरकुत्या कमी होण्यासही मदत होते. कोकम आपण आपल्या आहारात वेगवेगळ्या प्रकारे सेवन करु शकतो. कोकमचा ज्युस, कोकमचे सरबत तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकतात.
कोकममध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते जे आपल्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. फायबर आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. कोकमच्या सेवनाने बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि आम्लपित्त यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हे आपली पचनसंस्था निरोगी ठेवून अन्न पचवण्याची प्रक्रिया सुलभ करते. कोकमचे नियमित सेवन केल्याने पचनाच्या समस्या दूर होतात.
कोकममध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. ते पेशींना मुक्त रॅडिकल्स आणि प्रदूषणाच्या नुकसानीपासून वाचवतात. कोकममध्ये असलेले व्हिटॅमिन ई आपल्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवते आणि त्वचा मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.
कोकम रस : कोकमचा रस काढून तुम्ही त्याचे सेवन करु शकता. यामध्ये साखर किंवा मीठ घालून प्यायल्याने त्याची चव आणखी वाढते.
कोकमची चटणी बनवण्यासाठी कोकम उकळून मॅश करून त्यात मसाले आणि मीठ आणि मिरपूड टाकली जाते.
कोकम ज्यूस: ताज्या कोकमपासून ज्यूस देखील बनवता येतो आणि त्याचा सेवनही करता येते.