तुम्हाला जर ‘या’ समस्या असतील तर, टोमॅटोपासून नेहमी अंतर ठेवून रहा

| Updated on: Apr 11, 2022 | 5:17 PM

जवळपास सर्वच पदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर करण्यात येत असतो. तसेच टोमॅटो खाण्याचे अनेक फायदेदेखील आपल्याला आतापर्यंत सांगण्यात आलेले आहेत. परंतु आज या लेखातून कुठल्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या लोकांनी यापासून लांब रहावं, याची माहिती घेणार आहोत...

तुम्हाला जर ‘या’ समस्या असतील तर, टोमॅटोपासून नेहमी अंतर ठेवून रहा
टोमॅटो आरोग्यासाठी चांगले असते पण अतिसेवणामुळे त्याचे दुष्परिणामही होतात.
Follow us on

मुंबई : जेवणाची चव वाढवण्यासाठी टोमॅटोचा (Tomato) मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. यासोबतच टोमॅटो खाण्याचे अनेक फायदेसुद्धा आपल्याला अनेकांकडून सांगण्यात आले आहेत. टोमॅटोचे सेवन अनेक पद्धतीने केले जात असते. मुख्यत्वे भाज्या, सॅलड आणि चटणीमध्येही टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर (Fiber) असते. यामुळे पोटाच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होत असते. बद्धकोष्ठतेवरही टोमॅटो परिणामकारक ठरत असतो. त्यात ‘व्हिटॅमिन सी’ मोठ्या प्रमाणात असल्याने यातून आपली रोगप्रतिकारशक्तीदेखील (Immunity) वाढत असते. टोमॅटोमध्ये लाइकोपीन आणि पोटॅशिअमसारखे घटकदेखील मोठ्या प्रमाणात आढळतात. डॉक्टरांच्या मते, दिवसातून एक वेळा सॅलडमध्ये टोमॅटोचा नक्की वापर केला पाहिजे. परंतु इतके फायदे असूनही टोमॅटोचे काही लोकांना नुकसान देखील होऊ शकते. ते पुढील प्रमाणे :

मुतखडा

ज्या लोकांना किडनीत किंवा गॉल ब्लेडरमध्ये मुतखड्याची समस्या असेल त्यांनी टोमॅटोपासून लांब राहण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते, टोमॅटोमुळे मुतखड्याच्या समस्येत अधिक वाढ होऊ शकते. त्यामुळे ज्यांना आधीच मुतखड्याची समस्या आहे, अशा लोकांना टोमॅटोपासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

सांधेदुखी

ज्या लोकांना सांधे दुखीची समस्या असेल, अशांनी टोमॅटोपासून लांब राहण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत असतो. टोमॅटोच्या सेवनामुळे अशा लोकांमध्ये सांधेदुखी व गाठी होण्याच्या समस्या अधिक वाढू शकतात. टोमॅटोच्या सेवनामुळे सांधेदुखी असलेल्या लोकांमध्ये युरिक ॲसिडच्या पातळीत वाढ होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे सांधेदुखीची समस्या असलेल्या लोकांनी आपल्या आहारात कमीत कमी टोमॅटोचा वापर केला पाहिजे.

डायरिया

टोमॅटोमुळे डायरिया झालेल्या लोकांच्या समस्येत अधिक भर पडू शकते. अशा वेळी डायरियाने ग्रस्त लोकांनी टोमॅटोचे सेवन टाळले पाहिजे. टोमॅटो आपल्या शरीराला हायड्रेट ठेवत असला तरी, डायरियाच्या प्रकरणामध्ये यातून शरीराला विविध अपाय होत असतात. टोमॅटोमधील साल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया डायरियाच्या समस्येत अधिक वाढ करू शकतो. त्यामुळे डायरियाने ग्रस्त असलेल्या लोकांनी टोमॅटोच्या सेवनापासून लांब राहणेच योग्य असते.

संबंधित बातम्या :

Food : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी काकडीच्या सूपचा आहारात समावेश करा, जाणून घ्या रेसिपी!

Health : आयुष्यातून या 3 गोष्टी कायमच्या आऊट करा आणि जीवन बघा कसे सुंदर होते!

Health : आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी फक्त या 4 टिप्स फाॅलो करा आणि रोगांना दूर ठेवा!