मुंबई : उन्हाळ्यात तेलकट केसांची समस्या सामान्य आहे. यामुळे केसांमध्ये चिकटपणा येतो. वारंवार केस धुवूनही ही समस्या संपण्याचे नाव घेत नाही. विशेष म्हणजे लांबसडक केस दररोज धुणे देखील शक्य नसते. केस तेलकट झाल्यामुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या आणि खाज देखील सुटते. केसांचा तेलकटपणा घालवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या केसांचा तेलकटपणा कमी होईल. (If you suffer from oily hair, try this home remedy)
-एक कप पाण्यात एक लिंबू मिसळा आणि केसांच्या मुळांवर हळूवारपणे लावा. सुमारे 15 मिनिटांनंतर शॅम्पूने केस धुवा आणि स्वच्छ करा. आठवड्यातून किमान दोनदा हे करा. याशिवाय तेलकट केसांच्या समस्येसोबतच डोक्यातील कोंडाची समस्या सुटेल.
-दोन चमचे एलोवेरा जेल घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. आता हे एक कप पाण्यात चांगले मिसळा आणि केसांमध्ये हलक्या हातांनी मालिश करा. यानंतर थंड पाण्याने केस धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे केल्याने मोठे बदल होतील.
-एका वाटीत कोमट नारळ तेल घालून त्यात कापूराचा तुकडा मिसळा. हातांनी केसांची मालिश करा. हे तेल सुमारे एक तास आपल्या केसांवर ठेवा. यानंतर केस शॅम्पूने धुवा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने खूप फायदा होईल.
-रात्री झोपण्यापूर्वी टाळूची मालिश करणे खूप महत्वाचे आहे. असे केल्याने केसांच्या टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुरू होईल. हे आपले केस निरोगी आणि जाड बनवेल. केसांमध्ये बोटांनी मसाज करणे खूप फायदेशीर आहे. याशिवाय, तुम्ही शैम्पू करण्याच्या 2 तास आधी गरम तेलाने मालिश केली पाहिजे. असे केल्याने केस निरोगी, जाड आणि लांब होते.
-एक वाटी दह्यामध्ये एक लिंबू टाका आणि केसांना लावा. एक तासानंतर केस धुवा.
संबंधित बातम्या :
सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
हंगामी सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय ‘काळीमिरी’, जाणून घ्या याचे महत्त्वाचे फायदे…https://t.co/pe3zkVHUt4#BlackPepper #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2020
(If you suffer from oily hair, try this home remedy)