निरोगी आणि चमकदार त्वचा असावी अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. यासाठी महिला अनेक प्रकारे त्वचेची काळजी घेतात. काही जणी उपचार घेता तर काही महिला अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करतात. परंतु आजकाल ज्या प्रकाराची चुकीची जीवनशैली आत्मसात केली गेली आहे. त्यामुळे त्वचा निरोगी ठेवणे थोडे कठीण झाले. केवळ चुकीची जीवनशैलीच नाही तर वाढत्या वयाबरोबर त्वचा निस्तेज होते. जाणून घेऊ अशा काही सवयी ज्या चाळीस पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांनी त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये समाविष्ट केल्यास वृद्धत्वाची चिन्हे कमी करू शकतात आणि त्यांची त्वचा निरोगी आणि चमकदार बनवू शकतात.
शरीराला हा हायड्रेत ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. शरीरात पाण्याच्या कमतरतेचाही त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्या आणि तुमचे शरीर हायड्रेट ठेवा. वयाच्या 40 पेक्षा जास्त वयात ही तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार राहील. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने त्वचा हायड्रेत राहते. ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेची चमक वाढते.
बेरी, पालक, गाजर आणि टोमॅटो यासारखी अँटिऑक्सिडंट ने समृद्ध फळे आणि भाज्या खा. हे फ्री रॅडिकल्सपासून पासून त्वचेचे संरक्षण करतात. ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे सेवन त्वचेसाठी फायदेशीर ठरते. जास्त प्रक्रिया केलेले आणि साखर युक्त पदार्थ खाऊ नका कारण ते त्वचेचे निर्जलीकरण करू शकतात आणि सुरकुत्या वाढवू शकतात.
सूर्याच्या हानिकारक अतिरेकीरणामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते एस पी एफ 30 किंवा त्यावरील सनस्क्रीन नेहमी लावा. हवामान काहीही असो सन प्रोटेक्शन क्रीम आणि लोशन नेहमी वापरा. याच्या मदतीने तुम्ही वयाच्या 40 पेक्षा जास्त वयात हे निरोगी त्वचा मिळवू शकतात.
सात ते आठ तासांची चांगली झोप घेणे महत्त्वाचे आहे. झोपेच्या वेळी शरीर आणि त्वचेची दुरुस्ती होतेत्यामुळे त्वचा चमकदार होते. तसेच वाढत्या वयाबरोबर सुरकुत्या येण्यापासून रोखण्यास मदत होते.
रोज सकाळी आणि रात्री चांगला फेसवॉश वापरून चेहरा स्वच्छ करा. चांगले मॉइश्चरायजर वापरा. जेणेकरून तुमच्या त्वचेत ओलावा राहील. त्वचेच्या पेशींच्या नूतनीकरणात मदत करणारे अँटी एजंट क्रीम वापरा जी तुमची त्वचा अधिक काळ तरुण दिसण्यास मदत करते.