दिवसभर सक्रिय राहायचेय? मग ‘हे’ 6 हेल्दी ब्रेकफास्ट खा !

| Updated on: Apr 07, 2021 | 12:58 PM

दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे सकाळी नाश्ता करणे निरोगी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

दिवसभर सक्रिय राहायचेय? मग हे 6 हेल्दी ब्रेकफास्ट खा !
Follow us on

मुंबई : दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे सकाळी नाश्ता करणे निरोगी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सकाळची न्याहारी आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देते. सकाळचा नाश्ता हा नेहमी पचनास हलका आणि प्रोटीन्स युक्त असावा. नाश्त्यातील प्रोटीन्स आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासह चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करते. सकाळचा नाश्ता हा दिवस भरातील पहिला आहार असतो.  (If you want to stay healthy, then eat this breakfast)

साबुदाणा खिचडी
सकाळच्या नाश्त्यामध्ये साबुदाणा खिचडी हा एक चांगला पर्याय आहे. साबुदाणा खिचडीमध्ये शेंगदाणे, बटाटे आणि साबुदाणा असतो. हा नाश्ता शरीरासाठी खूप हलका आणि फायदेशीर असतो. त्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे. साबूची खिचडी बनविण्यात जास्त वेळ लागत नाही आणि यामुळे तुमची भूक शांत होईल. यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये साबुदाणा खिचडी खाणे कधीही चांगले

रवा उपमा
रवा उपमा हा एक लोकप्रिय दक्षिण भारतीय पदार्थ आहे. नाश्त्यामध्ये हे हलका आणि अतिशय चवदार डिश चांगला पर्याय आहे. जो आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. हे रवा उपमा हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, चिरलेली कांदे किसलेले आले, मोहरी, जिरे आणि चणा डाळ घालून तयार केले जाते. चवीनुसार तूप आणि मीठ घालू शकता.

पोहे
सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण पोहे खाऊ शकता. त्यामध्ये कॅलरींचे प्रमाण खूप कमी आहे आणि चरबीही अजिबात नाही. पोह्यामध्ये लोह आणि फायबर अधिक असते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होते. याशिवाय असे बरेच गुणधर्म आहेत, ज्यामुळे आपले वजन कमी होऊ शकते.

डोसा
डोसा हा देखील दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ तुम्ही न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि स्नॅक म्हणूनही खाऊ शकता. डोसा कार्ब आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. हा आपल्याला बर्‍याच काळासाठी उर्जावान बनवतो. यामुळे आपले हाडे आणि स्नायूही बळकट होतात. या पदार्थामध्ये चरबी कमी असते, ज्यामुळे आपल्या शरीरात कॅलरी वाढत नाहीत.

इडली
जर तुम्हाला इडली आवडत असेल आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, इडली तुमचे वजन कमी करण्यात अतिशय फायदेशीर ठरते. इडली ही दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ आहे आणि विशेषत: न्याहारीच्या वेळी ती खाल्ला जातो. तांदूळ वाटून तयार केला जाणारा ‘इडली’ हा पदार्थ, एक निरोगी अन्न आहे. त्यात तेल आणि लोणी वापरले जात नाही. इडलीमध्ये कॅलरींचे प्रमाणही कमी आहे.

ढोकळा
ढोकळा एक मऊ आणि स्पंजयुक्त डिश आहे. हा गुजरातचा सर्वात आवडता नाश्ता आहे. या डिशमध्ये भरपूर पोषक असतात. जर आपल्या ओट्स आणि कॉर्न फ्लेक्सच्या चवमुळे कंटाळल्या असतील तर आपण नक्की ढोकळा खायला पाहिजे. ढोकळ्यामध्ये कॅलरीचे प्रमाण देखील कमी असते. ढोकळा तयार करण्यासाठी देखील सोप्पा आहे. ढोकळ्याने पोट दिवसभर भरल्यासारखे वाटते.

संबंधित बातम्या : 

Healthy Diet | डाएटमध्ये करा हिरव्या भाज्यांचा समावेश, होतील अनेक फायदे!

Papaya | पपईचे अतिसेवन शरीरासाठी घातक, अनेक आजारांना मिळेल निमंत्रण!

(If you want to stay healthy, then eat this breakfast)