Hair Fall Treatment : सध्या दिवसांमध्ये तणाव, जेवणाची न ठरलेली वेळी, फास्ट फुड इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यवर होते. त्वचा खराब होते, वजन वाढतं एवढंच नाही तर, केस गळण्याचं प्रमाण देखील दिवसागणिक वाढत राहतं. काही परिस्थितीत वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे देखील केस गळण्याचं प्रमाण वाढतं. सांगायचं झालं तर, केस कमकुवत होण्याचा परिणाम शरीरावरही होतो. ज्यामुळे डोकेदुखीचा त्रासही सुरू होतो, त्यामुळे काम करावंसं वाटत नाही.
सांगायचं झालं तर, ज्याप्रमाणे शरीराच्या प्रत्येक अवयवाला पोषणाची गरज असते, त्याचप्रमाणे केसांनाही नियमित पोषण आणि काळजी घेणं आवश्यक असतं. केस गळण्याच्या पद्धतींपेक्षा आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष दिल्यास ही समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकते. तुमचे देखील केस गळत असतील तर, आजच पाच पदार्थ खाणं सोडून द्या.
जंक फूड : जंक फूडमध्ये चरबी, साखर आणि कॅलरीचं प्रमाण जास्त असल्याने ते आरोग्यासाठी हानिकारक आहे, ज्यामुळे केसांच्या वाढीवरही परिणाम होतो. जंक फूडच्या अतिसेवनाने केस कमकुवत होतातच पण पोटाशी संबंधित समस्याही निर्माण होतात.
साखर : प्रमाणापेक्षा अधिक साखर केसांसोबत आरोग्यासाठी देखील घातक ठरते. ज्यामुळे डायबिटीज आणि ओबेसिटी यांसारख्या समस्या डोकंवर काढतात. साखरेचं अधिक सेवन केल्यामुळे शारीरातील शुगर लेवल वाढते. ज्याचा परिणाम केसांवर देखील होती. केस गळण्यामागे अधिक गोड देखील मोठं कारण असू शकतं.
उच्च ग्लायसेमिक इंडेक्स अन्न : उच्च ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थांमुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. इन्सुलिनच्या असंतुलनामुळे केसांची बांधणी कमकुवत होते आणि केस गळण्याचे प्रमाण वाढते. साखर, गूळ, मध, पांढरा ब्रेड, बिस्किटे, उसाचा रस, पांढरा भात, उकडलेले बटाटे, रताळे, पिकलेले आंबे, केळी यांसारखी फळे, मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाणं टाळा.
अल्कोहल : तुम्ही अल्कोहलचं सेवन करत असाल तर आजपासूनच बंद करा. अधिक अल्कोहल सेवनामुळे फक्त केसांवर नाही तर, शरीरावर देखील वाईट परिणाम होतात. म्हणून अल्कोहल केस आणि शरीरासाठी घातक आहे.
अंडे : अंडे फक्त केसांसाठी नाही तर, संपूर्ण शरीरासाठी लाभदायक आहे. पण कच्च अंड खात असाल तर, आजच बंद करा. कच्च्या अंड्याच्या पांढऱ्यामुळे बायोटिनची कमतरता होऊ शकते. बायोटिन हे एक जीवनसत्व आहे जे केराटिन उत्पादनास मदत करते. केराटीन कमी झाल्याचा परिणाम केसांवर होतो.