मुंबई : सध्या देशामध्ये कोरोनाने कहर केला आहे. कोरोना रूग्णांची संख्या ही वाढत आहे. सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. कारण कोरोना रूग्णाला रुग्णालयात साधा बेड देखील मिळत नाहीये. यामुळे कोरोनापासून दूर राहण्यासाठी आपण सर्वांनीच आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. हेल्ही आहारा, व्यायाम आणि रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल हे बघितले पाहिजे. (Immunity Drink Ajwain water to increase)
ओव्याचे पाणी तयार करण्यासाठी
साहित्य
1. एक चमचा ओव्याची दाणे
2. तुळशीची पाने
3. अर्धा चमचे मिरपूड पावडर
4. एक चमचे मध
तयार करण्याची पद्धत
एक कढई घ्या आणि त्यात एक ग्लास पाणी, ओव्याचे दाणे, तुळसीची पाने आणि मिरपूड पावडर मिक्स करावे आणि सुमारे 5 मिनिटे उकळी येऊ द्या. हे मिश्रण एका कपमध्ये घ्या आणि थंड झाल्यावर मध घाला आणि प्या.
रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल
ओव्या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ओव्याच्या या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत. यात दाह-विरोधी गुणधर्म आहेत जे आपल्याला सर्दी आणि कफपासून संरक्षण करण्यास मदत करतात. याशिवाय तुळशीची पाने, काळी मिरी आणि मध तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. जेणेकरून तुम्ही आजारांपासून दूर राहाल.
पोटदुखी, गॅस, अपचन झाल्यास ओव्यासह काळे मीठ आणि चिमूटभर हिंग घालून खाल्ले जाते. वास्तविक, ओव्यामध्ये थायमोल नावाचे एक कंपाऊंड, अँटीस्पास्मोडिक आणि कॅमेनिटिव गुणधर्म असतात, जे पोटातील वायूचा प्रभाव कमी करण्यासाठी औषध म्हणून काम करतात
काही लोकांचे केस अकाली पांढरे होऊ लागतात. ओवा केस अकाली पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करतो. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा कढीपत्ता, मनुका, साखर आणि ओवा घालून त्याचा काढा तयार करा. या काढ्याचे नियमित सेवन केल्यामुळे केस अकाली पांढरे होणार नाहीत.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!
Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!https://t.co/5d5zna9tBx#diabetes #Sugar #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2020
(Immunity Drink Ajwain water to increase)