मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात बदलती जीवनशैली आणि पौष्टिक आहाराच्या अभावामुळे आपल्यापैकी बरेच लोक उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहेत. रक्तदाब हा आजार ‘साइलेंट किलर’ म्हणूनही ओळखला जातो. सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याकडे वेळ नाहीये. मात्र, उच्च रक्तदाबाची समस्या लोकांमध्ये वाढतच चालेली आहे. उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी लसूण खूप फायदेशीर आहे. (Include garlic in the diet to eliminate the problem of high blood pressure)
आपण जर लसूणचा समावेश आपल्या आहारात केला तर आपली उच्च रक्तदाबाची समस्या दूर होण्यास नक्की मदत होईल. लसूणमध्ये अँटी व्हायरल, अँटी फंगल आणि अँटी ऑक्सिडंट आहेत. आयुर्वेदात लसूण एक उत्तम औषध म्हणून वापरली जाते. लसूनमध्ये भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए आणि ई सुद्धा आहेत. लसणाच्या सेवनामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढते. ज्या लोकांना उच्च रक्तदाब समस्या आहे. त्यांच्यासाठी खूप लसूण खूप फायदेशीर आहे. लसूणमधील प्रथिने 6.3 टक्के, चरबी 0.1 टक्के, कार्ब 21 टक्के, खनिज 1 टक्के, लोह 0.3 टक्के, जीवनसत्त्वे ए, बी, सी एवढे घटक लसूणामध्ये असतात.
लसूण सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. लसण्याच्या रसाबरोबर तुम्ही मीठ, तूप आणि भाजलेली हिंग खाऊ शकता. हे आपल्या पाचक प्रणालीस ठीक ठेवण्यास मदत करते. लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे खाऊ शकता. असे केल्याने हृदय निरोगी राहते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. लसूणमध्ये औषधी गुण आहेत. याचे सेवन केल्याने आपणास सर्दी व तापापासून संरक्षण मिळते. यासाठी दररोज सकाळी कच्चा लसूण रिकाम्या पोटी खाल्ला पाहिजे.
उच्च रक्तदाब टाळण्यासाठी काय करावे?
दररोज व्यायाम करा
उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी, दररोज कमीतकमी अर्धा तास हृदय व्यायाम करा.
आहारात कमी मीठ
आहारात मीठाचे सेवन कमी करा. आहारातील बहुतेक सोडियम हे पॅक प्रोसेस्ड केलेल्या अन्नातून येतात, जे टाळणे अतिशय आवश्यक आहे.
ध्यानधारणा करा
संशोधनानुसार, ध्यानधारणा करण्याचे वेगवेगळे मार्ग केवळ एखाद्या व्यक्तीचा ताणतणाव दूर करत नाहीत, तर उच्च रक्तदाबही नियंत्रित करतात.
आरोग्यदायी आहार
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी, ज्वारी, बाजरी, गहू, ओटचे जाडे भरडे पीठ आणि स्प्राउट्स इत्यादी उच्च फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. तसेच, दररोज किमान 10 ग्लास पाणी प्या.
उन्हात बसा
त्वचेच्या थरात असलेले नायट्रिक ऑक्साईड रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. जेव्हा त्वचेवर सूर्यप्रकाश पडतो, तेव्हा त्वचेत नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. यासाठी सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात काही वेळ बसा.
नारळ पाणी
नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात सोडियमचा प्रभाव कमी होण्यास मदत होते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Include garlic in the diet to eliminate the problem of high blood pressure)