Weight Loss : कमी कॅलरीयुक्त पदार्थ खा; वजन झटपट कमी करा!

| Updated on: May 16, 2021 | 1:13 PM

वजन कमी करण्यासाठी प्रथिने समृध्द असलेले पदार्थ आहारात घेतले पाहिजे. यामुळे बऱ्याच वेळ आपल्याला भूक लागत नाही.

Weight Loss : कमी कॅलरीयुक्त पदार्थ खा; वजन झटपट कमी करा!
हेल्दी फूड
Follow us on

मुंबई : वजन कमी करण्यासाठी प्रथिने समृध्द असलेले पदार्थ आहारात घेतले पाहिजे. यामुळे बऱ्याच वेळ आपल्याला भूक लागत नाही. एका व्यक्तीला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज 0.8 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, आहारात प्रथिने समृध्द अन्नाची मात्रा वाढवा. जास्त कॅलरीमुळे आपले वजन कमी होणार नाही. म्हणून, आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करावा लागणार ज्यामध्ये प्रथिने जास्त आणि कॅलरी कमी असतील. (Include low calorie foods in the diet to lose weight)

कॉटेज चीज
कॉटेज चीजमध्ये उष्मांक कमी असतो. कॉटेज चीजच्या 100 ग्रॅममध्ये 11 ग्रॅम प्रथिने असतात. याव्यतिरिक्त, कॅल्शियम जास्त आणि कॅलरी कमी असतात. आपल्या आहारात कॉटेज चीज समाविष्ट करण्याचे बरेच मार्ग आहेत. यामुळे आपली भूक शांत राहण्यास मदत होते आणि स्नायू तयार होतात.

डाळी
डाळी, शाकाहारी लोकांसाठी प्रथिने बनविण्याचा एक चांगला स्रोत आहे, जे शिजविणे सोपे आणि स्वादिष्ट आहे.  वेगवेगळ्या डाळी आपण आहारात घेतल्या पाहिजेत. मूग आणि हरभरा डाळीमध्ये पोषक घटक आणि प्रथिने असतात. जे वजन कमी करण्यास मदत करतात. एक कप डाळीत 18 ग्रॅम प्रथिने आणि 16 ग्रॅम फायबर असते. यामुळे आपले पोट बऱ्याच काळ भरल्यासारखे वाटते आणि बद्धकोष्ठतेची समस्या यामुळे दूर होते.

अंडी
अंडी अनेक पोषक घटक आणि प्रथिने समृद्ध असतात. जे आपल्या शरीरास योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, अंड्यातील पिवळ बलक खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. परंतु त्यांच्यात प्रथिने जास्त प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी पालक, शिमला मिरची आणि कांदा इ.मध्ये मिसळा आणि ते खा.

चिकन ब्रेस्ट
जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी चिकन ब्रेस्ट हा प्रथिनेचा चांगला स्रोत आहे. 85 ग्रॅम चिकनमध्ये 20 ग्रॅम प्रथिने आणि एक ग्रॅम चरबी असते. त्यातील कॅलरीचे प्रमाण खूप कमी आहे. हे खाल्ल्याने तुम्हाला फार काळ भूक लागत नाही. चिकन बनवताना मसाले आणि तेलाऐवजी अधिक भाज्या वापरा. तसेच नेहमीच ताजे चिकन खा. प्रक्रिया केलेले चिकन आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

संबंधित बातम्या : 

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी

(Include low calorie foods in the diet to lose weight)