मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनासह इतर संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होण्यामागे अनेक कारण आहेत. कित्येकदा आपल्या खाण्या-पिण्याच्या हलगर्णीपणामुळेही आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. (Include this to boost immunity)
दारु, सिगारेट यासारख्या चुकीच्या सवयीमुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम जाणवतो. काही घरगुती उपायांनीही तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता. आपल्या शरीरातील इम्यून सिस्टममुळे आपला वेगवेगळ्या आजारापासून बचाव होतो. जर रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाली तर आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं गरजेचं आहे.
-कोकोत शक्तीशाली अँटी इनप्लिमेंट्रीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असतो. जे कोलोस्ट्रोलची पातळी सुधारण्यास मदत करतात.
-कारल्याची चव ही कडू असते मात्र, तरी चांगल्या तब्येतीसाठी कारले खाणे खूप आवश्यक आहे. कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि अॅंटी-ऑक्सीडंट भरपूर प्रमाणात असतं. डायबिटीसच्या आजाराला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीही कारले मदत करते.
-ग्रीन टी मध्ये अॅंटी-ऑक्सीडंट आणि पॉलीफेनॉल असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि हाडांना बळकट करण्यासाठी ग्रीन टीचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.
-फक्त लिंबूच नाही तर लिंबाचे पाणांचा रस हा सुध्दा तब्येतीसाठी फायदा होतो. लिंबाच्या पानांची चव कडू असते. त्यामुळे प्लेव्होनॉइड असते. प्लेव्होनॉइडचे काम हे फळांमधील किड्यांपासून संरक्षण करणे आहे. आंबट फळांच्या पानांना चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले गेले आहे.
-कच्चा लसून खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लसूनमध्ये भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए आणि ई सुद्धा असतात.
-विटामिन डी हे आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्याला अनेक रोगांचा सामना करण्याची ताकद मिळते. त्यासोबतच आपली हाडेही मजबूत होतात. तसेच हृदयासंबंधीत अनेक आजारापासूनही तुम्ही मुक्त होऊ शकता.
संबंधित बातम्या :
तुळशीची 4 पानं, दालचिनी 2, रोग प्रतिकार शक्तीसाठी आयुष मंत्रालयाचा आर्युर्वेद काढा कसा बनवाल?
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(Include this to boost immunity)