मुंबई : आपल्या सर्वांना हे माहित आहे की, निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी निरोगी आहार अत्यंत महत्वाचा आहे. आपला आहार नेहमी जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असावा जो आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतो. मात्र, बहुतेक लोकांना असे वाटते की, दीर्घायुष्य जगण्यासाठी मांस आणि अंडी खाणे आवश्यक आहे. मात्र, हे हावर्डच्या नवीन संशोधनामध्ये नाकारण्यात आले आहे. (Include two fruits and three vegetables in your daily diet and achieve long life)
हावर्डच्या अभ्यासानुसार, दीर्घायुष्यासाठी अधिक फळे आणि भाज्या आहारात घेतल्या पाहिजेत. हिरव्या भाज्या आणि फळे आपली अंतर्गत प्रणाली मजबूत करतात आणि जीवघेणा रोगांचा धोका कमी करण्यास मदत करतात. मार्च 2021 मध्ये अमेरिकन हेल्थ असोसिएशनने आणि हावर्ड टी.एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की ,फळ आणि भाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दररोज 2 फळे आणि 3 भाज्या खाल्याने मृत्यू दर कमी केला जाऊ शकतो. मात्र, संशोधकांच्या मते, सर्व फळे आणि भाज्या दीर्घायुष्यासाठी फायदेशीर नसतात.
कोणत्या भाज्या खाव्यात?
हिरव्या पालेभाज्या – पालक, कोबी, बीट आणि सर्व हिरव्या भाज्या
बीटा कॅरोटीन समृध्द भाज्या – गाजर, रताळे, ब्रोकोली
आंबट फळे- पेरू, संत्रा, बेरी, स्ट्रॉबेरी
या व्यतिरिक्त आणखीही बर्याच गोष्टी आहेत. ज्या दीर्घायुष्यासाठी मदत करतात. तुम्ही मेडिटेरियन आहार घ्या. बर्याच अभ्यासांनी असा दावा केला आहे की मेडिटेरियन डाएटमुळे हृदय आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. पालक, मेथी, चवळी, चुका, शेपू इत्यादी भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात.
कोणत्याही रोगात, डॉक्टर हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅलरी आढळतात. यामध्ये कार्बोहायड्रेट देखील कमी प्रमाणात असतात, ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. त्यातील पोषक घटक आणि अँटिऑक्सिडेंट्समुळे आपल्या हृदय आणि डोळ्यांनादेखील फायदा होतो.
संबंधित बातम्या :
Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!
Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतील ‘ही’ योगासने, तुम्हीदेखील नक्की ट्राय करा!#beautytips | #skincare | #yoga | #beauty https://t.co/zqbiogPSVT
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
(Include two fruits and three vegetables in your daily diet and achieve long life)