कुणाच्या बाबतीत केव्हा काय घडेल, काही सांगता येत नाही. नख स्वच्छ करण्यासाठी एका महिलेनं पेडिक्युर ही ट्रीटमेंट केली. मात्र, त्यामुळं तिला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. पण, 13 कोटी रुपये तिला सलूनकडून मिळाल्यानं तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
पेडिक्युअर ही पाय आणि नखांना करण्यात येणारी एक कास्मेटिंक ट्रीटमेंट आहे. जगात ही ट्रीटमेंट प्रसिद्ध आहे. यामुळं पायाच्या खालच्या भागाची त्वचा मऊ राहते. शिवाय नख स्वच्छ राहतात. पेडिक्युअरमध्ये पायांची स्वच्छता केली जाते. नखांची सफाई होते. योग्य आकारात ठेवले जाते. स्कीन काढून मसाज केली जाते. पेडिक्युअर ही ट्रीटमेंट एका महिलेला चांगलीच भारी पडली. पायाच्या खालचा भाग कापावा लागला. त्यामुळं ती हतबल झाली होती. अमेरिकेत ही घटना समोर आली.
क्लारा सेलमॅन असं या पीडित महिलेचं नाव. ती पेडिक्युअर करण्यासाठी सप्टेंबर 2018 मध्ये टॅमीज् नेल्स इथं गेली होती. डेली मेलनुसार, या महिलेनं पेडिक्युअर केल्यानंतर रक्तात संसर्ग झाला होता. कारण तिचे उपचार जुन्या बोथड अवजारांनी केले गेले होते. सलूनच्या कर्मचाऱ्यांनी सरकारी धोरणांचा अवलंब केला नव्हता. नियमांची पायमल्ली करून ही ट्रीटमेंट करण्यात आली होती. वर्तमानपत्रांमध्ये या बातम्या प्रकाशित झाल्या. त्यानंतर तिनं सलुनविरोधात कोर्टात धाव घेतली. या महिलेनं मे 2020 मध्ये खटला दाखल केला.
दरम्यान, क्लारा सेलमॅनच्या पायाचा खालचा भाग कापल्यामुळं तिचे चालणे मुश्कील झाले होते. पाय कापला गेल्यामुळं तिला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला होता. तिला तिचे घर सोडावे लागले. ती फिरण्यास सक्षम नव्हती. कित्तेक कामांसाठी ती दुसऱ्यावर निर्भर होती. तिची मुलगी शाळेत जाऊ शकत नव्हती.
कोर्टानं सलूनला दंड ठोठावला. नियमाचा भंग करून शस्त्रक्रिया केल्याचा ठपका संबंधित सलूनवर ठेवला. त्यामोबदल्यात महिलेला एक पाईंट 75 मिलीयन म्हणजे 13 कोटी रुपये मिळाले. ही रक्कम 16 डिसेंबर रोजी जाहीर होताच ती ओक्सीबोक्सी रडली. कारण त्यापूर्वी तीनं बऱ्याच समस्यांचा सामना केला होता.