International Yoga Day : 2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत योगा दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. गेल्या 10 वर्षांपासून योग दिन साजरा केला जातो. सांगायचं झालं तर, आजच्या धावपळीच्या आयुष्यात योगा करणं आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. नियमित योगा केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहतं. पण कोणतीही गोष्ट करण्याची एक खास पद्धत आणि काही नियम असतात.
योग केल्यामूळे संपूर्ण शरीराला त्याचा फायदा होतो आणि पचन क्रिया देखील सुधारते. पण योग करताना देखील काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं असते. तर योग संबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊ. तुम्ही घरी योग करत असाल तर या काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
योग केल्यानंतर किमान 30 मिनिटं अंघोळ करायची नाही. पणी प्यायचं नाही, काही खायचं देखील नाही. योग केल्यानंतर 30 मिनिटं पाणी प्यायचं नाही. ज्यामुळे तुमची प्रकृती स्थिर राहते आणि शरीर थंड ठेवण्यात मदत होते. योग केल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास वात, पित्त आणि कफ यांसारख्या समस्या डोकंवर काढतात.
योग केल्यानंतर लगेच पाणा प्यायल्यास दीर्घकाळापर्यंत थंडीचा त्रास होऊ शकतो. म्हणून यासर्व समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असल्यास 30 मिनिटं पाणी पिणं टाळा. योगा केल्यानंतर योग्य डाएट देखील फार महत्त्वाचं आहे.
योग केल्यानंतर फॅट, प्रोटील, काब्रोहायड्रेटसोबत कमीतकमी अर्धा लीटर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. पण कोणताही आहार आणि योगा करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तर कोणते पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहेत जाणून घ्या…
सोया, मुग आणि हरभरा यांसारखे अंकुर, ग्रीन स्मूदी, फळ, केळी, बदाम, उकडलेल्या भाज्या, लापशी, घरी तयार झालेले पदार्थ म्हणजे इडली, पोहे, उपमा इत्यादी पदार्थ तुम्ही खाऊ शकता. यानंतर जेवणात डाळ, भात, दही आणि खिचडी घ्या.
याशिवाय तुम्ही सफरचंद खाऊ शकता ज्यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा होणार नाही. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. योगा केल्यानंतर तुम्हाला ऊर्जा मिळते. याशिवाय, योगानंतर अनेक समस्या ठिक होण्यास मदत होते. स्नायूंना निरोगी ठेवण्यास मदत होते. त्यामुळे योगानंतर या गोष्टी तुमच्या आहारात लक्षात ठेवा. डाएट घेण्यापूर्वी देखील डॉक्टरांचा सल्ला घ्या.