Infertility in Male | जीम रुटीनमधील ‘या’ चुका तुमच पिता बनण्याचं सुख घेऊ शकतात हिरावून

| Updated on: Sep 26, 2023 | 3:31 PM

Infertility in Male | जीम रुटीनमध्ये कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत?. व्यायामामुळे वंध्यत्वावर कसा परिणाम होऊ शकतो? एक्सपर्ट्सनी काय सांगितलय? जीम रुटीनमध्ये कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत?

Infertility in Male | जीम रुटीनमधील या चुका तुमच पिता बनण्याचं सुख घेऊ शकतात हिरावून
Infertility in Male
Image Credit source: Freepik
Follow us on

मुंबई : नियमित जीम रुटीनच पालन करणं, वर्कआऊटच्या माध्यमातून स्वत:ला एक्टिव ठेवणं एक चांगली सवय आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का? जीम रुटीनमधील काही चुकांमुळे पुरुषांची पिता बनण्याची शक्ती हिरावली जाऊ शकते. मागच्या काही वर्षात भारतात इनफर्टिलिटीची समस्या वाढली आहे. यात जिमिंग एक प्रमुख कारण आहे. एनसीबीआयच्या एका रिपोर्टमध्येही हा दावा करण्यात आलाय. जिमिंगचा पुरुषांच्या स्पर्म काऊंटवर परिणाम होतो. जीम रुटीनमुळे पुरुषांमध्ये इनफर्टिलिटीची समस्या कशी वाढते ते एक्सपर्टकडून समजून घेऊया.

बॉडी बिल्डिंग किंवा वेट लॉससाठी सप्लीमेंट्स किंवा दुसऱ्या गोष्टी घेतल्या जातात. यात स्टेरॉयड येतं. स्टेरॉयडच्या जास्त सेवनामुळे पुरुष आणि महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या वाढू शकते. दिल्लीच्या राजीव गांधी हॉस्पिटलचे अजीत जैन यांनी सांगितलं की, स्टेरॉयडच्या अतिसेवनामुळे शरीराच अनेक प्रकारच नुकसान होतं. स्टेरॉयड असलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे पुरुषांची फर्टिलिटी प्रभावित होते, असं काही रिसर्चमध्ये म्हटलं आहे. एखादी व्यक्ती काही वर्षांपासून स्टेरॉयडचा वापर करत असेल, तर इनफर्टिलिटीची समस्या येऊ शकते.

ओवर एक्सरसाइज घातक

कुठल्याही गोष्टीच्या अतिसेवनामुळे नुकसान होऊ शकतं. जीममधल्या ओवर एक्सरसाइज म्हणजे अति व्यायामामुळे सुद्धा असं होऊ शकतं. जिमिंग आणि पुरुषांच्या इनफर्टिलिटीचा थेट संबंध नाहीय. पण वर्कआऊट करताना होणाऱ्या चुकांचा परिणाम होतो. NCBI च्या एका रिपोर्ट्नुसार ओव्हर व्यायामामुळे टेस्टोस्टेरोनवर प्रभाव पडतो. त्यामुळे स्पर्म काऊंट कमी होऊ शकतो.

काय काळजी घ्यावी?

एक्सपर्टच म्हणण आहे की, चुकूनही ओव्हर एक्सरसाइज करु नका.
गरजेपेक्षा जास्त स्टेरॉयड सेवन टाळा.
स्टॅमिन वाढीसाठी हेल्दी फूड्स फळ आणि भाज्यांच सेवन करा.
स्पर्म काऊंटची क्वालिटी ठीक करण्यासाठी स्मोकिंग, अल्कोहल किंवा दुसऱ्या कुठल्याही नशेपासून स्वत:ला दूर ठेवा.