मुंबई : देशामध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. या काळात आपण आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली पाहिजे. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोरोनापासून दूर राहू शकतो. (It is beneficial to drink hot water daily during corona)
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेकांनी आपल्या आहारात बदल केले आहेत. सकाळच्या चहाची जागा आता काढाने घेतली आहे. कारण दररोज रिकाम्या पोटी काढा घेतल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच अनेकांनी थंड पाण्याऐवजी गरम पाणी घेण्यास सुरूवात केली आहे. आज आम्ही तुम्हाला गरम पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहोत.
सर्दी व खोकल्यापासून मुक्त व्हाल
सर्दी किंवा पडसे झाल्यास नाक बहुतेक वेळा बंद होते. तर अशा परिस्थितीत जर तुम्ही गरम पाण्याचे सेवन केले, तर लवकरच तुमच्या समस्या कमी होतील. सर्दीमुळे घश्यात खोकला आणि शिंक येण्याचा त्रास होत असला, तरी गरम पाण्याचे सेवन करणे चांगले मानले जाते.
शरीर डीटॉक्स होते
गरम पाण्याचे सेवन आपल्या शरीरास डिटॉक्स करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. हे पाणी सेवन केल्याने तुमच्या शरीरात उपस्थित सर्व प्रकारचे टॉक्सिक घटक बाहेर फेकले जातात आणि बॉडी डिटॉक्सही होते.
पचन योग्य ठेवते
जर, आपण दररोज गरम पाण्याचे सेवन केले, तर ते आपल्या पाचन तंत्रास खूप मजबूत करते. गरम पाण्याचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठता, आम्लपित्त, आंबट ढेकर येणे आणि अपचन यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते आणि त्याच वेळी अन्न पचन करण्यासाठी गरम पाणी खूप प्रभावी ठरते.
रक्त परिसंचरण योग्य ठेवते
दररोज गरम पाण्याचे सेवन केल्याने तुमचे रक्त परिसंचरण सुरळीत होते, यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण चांगले होते.
गरम पाण्याची वाफ घ्या
नाकातून श्वास घेण्यास तुम्हाला जर त्रास होत असेल तर एक ग्लास गरम पाणी करून आपण वाफ घेतले पाहिजे. यामुळे आपण नाकातून श्वास घेऊ शकतो. सर्दी आल्यावर डोक जड पडते. अशावेळी आपण गरम पाण्याने वाफ घेतले पाहिजे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Health | केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत, शरीरातील अनेक समस्यांवर गुणकारी ‘कांदा’!
Lipstick shades | तुमच्या चेहऱ्यासाठी लिपस्टिकचा कोणता रंग ठरेल सर्वोत्तम? जाणून घ्या…
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(It is beneficial to drink hot water daily during corona)