मुंबई : शिमला मिरची खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामध्येही लाल शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते. ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन ए ची कमतरता त्यांनी दिवसातून किमान एकदा तरी लाल शिमला मिरची खावी. लाल शिमला मिरचीमध्ये जीवनसत्त्वे सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फायबर आणि बीटा कॅरोटीन यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. (It is beneficial to eat red capsicum to make up for vitamin A deficiency)
लाल शिमला मिरचीमध्ये कॅलरी मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही. व्हिटॅमिन सीचे सेवन रोगप्रतिकारशक्ती सुधारते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत होते. यामुळे आहारात जास्त-जास्त लाल शिमला मिरचीचा समावेश करा. शिमला मिरची खाल्ल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते. बाजारात हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगाच्या शिमला मिरची मिळतात. मात्र, आपल्या आरोग्यासाठी लाल रंगाची शिमला मिरची चांगली असते.
शिमला मिरची एंटी-ऑक्सिडेंट, अँटीइन्फ्लेमेटरी घटक आणि सल्फर, कॅरोटीनॉइड लाइकोपीन देखील असते. यामुळे कर्करोगासारख्या आजारांना टाळण्यासही फायदेशीर आहे. जर आपल्याला गुडघे आणि सांध्यामध्ये समस्या असतील तर शिमला मिरचीचे सेवन करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. शिमला मिरची खाणे आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. शिमला मिरचीमध्ये असलेल्या घटकांमुळे त्वचेसंदर्भात असलेल्या वेगवेगळ्या समस्या दूर होण्यास मदत होते.
आपल्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर आपण शिमला मिरची आहारात दररोज घेतली पाहिजे. त्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन सी लोह वाढवण्यास मदत करते. सर्वात मुख्य म्हणजे शिमला मिरची खाल्ल्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो. जरी आपल्याला मधुमेह नियंत्रित करायचा असेल तर, शिमला मिरची आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. शिमला मिरची रक्तातील साखरेसाठी आवश्यक योग्य पातळी राखते आणि मधुमेहापासून तुमचे रक्षण करते.
संबंधित बातम्या :
Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…
कांद्याच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या…
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(It is beneficial to eat red capsicum to make up for vitamin A deficiency)