मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहाता आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण देशामध्ये कोरोना रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालेली आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी फक्त एकच उपाय आहे, तो म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे. कारण जर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोरोनापासून आपण दूर राहू शकतो. (Jaggery, lemon and honey water are beneficial for boosting the immune system)
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे पेय अतिशय फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला एक लिंबू, मध, गुळ आणि पाणी लागणार आहे. सर्वात अगोदर एक ग्लास पाणी मंद आचेवर ठेवा. त्यानंतर या पाण्यात मध आणि गुळ मिक्स करून घ्या. त्यानंतर शेवटी यामध्ये लिंबाचा रस घाला हे पाणी साधारण 20 ते 25 मिनिटे उकळूद्या. हे पाणी एका ग्लासमध्ये काढा आणि प्या.
हे पाणी आपण दररोज सकाळी उपाशी पोटी पिले पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. मध खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचा संग्रह आहे. रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्याव्यतिरिक्त, मध अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे. आयुर्वेदात याचा उपयोग सर्व रोग बरे करण्यासाठी केला जातो. खोकल्याचा त्रास बराच काळ बरा होत नसेल, तर मधाचे सेवन करणे खूप उपयुक्त ठरू शकते.
मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे संसर्ग रोखतात. तसेच, मध कफ सहजपणे काढून टाकतो. लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची मात्रा अधिक असते. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. लिंबामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. थकवा दूर करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबाचा उपयोग केला जातो.
सध्याचा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तर दररोज आहारामध्ये लिंबाचा समावेश करणे आवश्यक आहे. कारण लिंबामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लिंबू अत्यंत फायदेशीर आहे. दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस घाला आणि प्या यामुळे आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी निघून जाण्यास मदत होती.
संबंधित बातम्या :
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
दुधाच्या चहापेक्षा ‘ग्रीन टी’ला मिळतेय सर्वाधिक पसंती! वाचा या ‘ग्रीन टी’चा रंजक इतिहास…#GreenTea | #Health | #food | #drink https://t.co/VMbYebOZ9t
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Jaggery, lemon and honey water are beneficial for boosting the immune system)