ओव्याचे पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!

| Updated on: Jul 11, 2021 | 5:34 PM

ओवा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते.

ओव्याचे पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
ओवा
Follow us on

मुंबई : ओवा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात आढळतात. ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे वातावरण शुद्ध होते. त्यामुळे ओव्याचा नैसर्गिक औषध म्हणून देखील वापर केला जातो. (Ajwain juice is beneficial for health)

विशेष म्हणजे ओव्याचा रस आपण दररोज घेतला तर आपले वजन कमी होण्यास मदत होते. जर तुमच्या पोटात दुखत असेल तर ओवा तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे. गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता झाल्यास काळी मिठ मिसळून ओवा खावा. ओवा आपल्या घरी सहज उपलब्ध असलेला पदार्थ आहे. ओवा हा बहुगुणी आहे. आयुर्वेदात ओवा पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

त्यामध्ये उपस्थित थायमोक्विनोनमधील सक्रिय घटक स्वाभाविकच अँटिऑक्सिडेंट आणि विरोधी दाहक गुणधर्म असतात. हे आपल्या शरीरावर नैसर्गिकरित्या विषारी द्रव बाहेर टाकण्यास मदत करते. यामुळे ओटीपोटातील चरबी कमी होऊ शकते. ओव्याचा रस घरी तयार करण्यासाठी आपण ओव्याला काही वेळ पाण्यात भिजवावे आणि त्यानंतर ते त्यामध्ये लिंबू मिक्स करा आणि प्या. हा ओव्याचा रस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

ओव्याचे पाणी पोट कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. एका ग्लास पाण्यात एक मोठा चमचा ओवा घालून ते पाणी उकळा. नंतर ते पाणी कोमट करून प्या. आपण इच्छित असल्यास, ते एकाचवेळी मोठ्या प्रमाणात तयार करू शकता आणि ते एका भांड्यात ठेवू शकता. त्यानंतर, आपण दिवसभरात कधीही हे पाणी पिऊ शकता असे केल्याने, लवकरच आपल्याला चांगले परिणाम दिसतील.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Ajwain juice is beneficial for health)