मुंबई : अनेक वेळा मुलींना आणि स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान खूप त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, अनेक स्त्रियांना खालच्या ओटीपोटात असह्य वेदना आणि पेटके जाणवतात. कधीकधी सांधे, पाय आणि कंबरेमध्येही वेदना होतात. सहसा, ओटीपोटात दुखण्याची समस्या गर्भाशयाच्या आकुंचन आणि गर्भाशयात रक्ताच्या कमतरतेमुळे होते. (Avoid eating these 5 foods during periods)
खरं तर, जेव्हा गर्भाशय आकुंचन प्रक्रिया सुरू करतो. तेव्हा प्रोस्टाग्लॅंडिन हार्मोन्स बाहेर पडतात. दरम्यान, गर्भाशयातून गुठळ्या देखील बाहेर येतात. ज्यामुळे वेदना अधिक जाणवतात. दुसरीकडे, जर एखाद्या महिलेला फायब्रॉईड, ओटीपोटाचा दाहक रोग किंवा एंडोमेट्रिओसिस असेल तर तिला मासिक पाळी दरम्यान अधिक तीव्र वेदना जाणवू शकतात. मासिक पाणी दरम्यान आपण काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे.
1. काही लोक मासिक पाळी दरम्यान चहा आणि कॉफीचे जास्त सेवन करतात. पण कॅफीन तुमच्या वेदना वाढवण्याचे काम करते. यासोबतच पोटात जास्त गॅस तयार होतो. यामुळे तुमची समस्या वाढू शकते. त्यामुळे या दरम्यान चहा आणि कॉफी टाळा. त्याच्या जागी तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता.
2. चॉकलेट खाल्ल्याने तुमच्या पेटकेही वाढतात. कारण चॉकलेटमध्ये कॅफीन देखील आढळते. कॅफीनमुळे स्नायू आकुंचन पावतात, ज्यामुळे ओटीपोटात दुखण्याची समस्या वाढते.
3. मासिक पाळी दरम्यान अल्कोहोल किंवा ड्रग्जच्या सेवनाने खालच्या ओटीपोटात सूज वाढते. यामुळे तुमचे दुखणेही वाढते. त्यामुळे या काळात दारूचे सेवन करू नका.
4. पीरियड्स दरम्यान थंड गोष्टी जसे दही, ताक, थंड पेय इत्यादी घेणे टाळा. यामुळे पोटात सूज वाढते आणि वेदना वाढतात. याशिवाय लोणचे, लिंबू आणि इतर आंबट गोष्टी देखील टाळाव्यात.
5. मासिक पाळी दरम्यान जंक फूड किंवा पॅकेट फूडपासून दूर रहा. यावेळी शरीरातून रक्ताची कमतरता होत. त्यामुळे शरीराला पोषक तत्वांची गरज असते. म्हणून, या दरम्यान, निरोगी आणि हलके अन्न खा जे सहज पचता येईल.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(Avoid eating these 5 foods during periods)