मुंबई : केळीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात. आपल्या सर्वांना केळीच्या फायद्याबद्दल माहिती आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, केळीची साल सुध्दा आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीचा साल आपल्या चेहऱ्यावर चोळली तर आपली त्वचा चांगली होते. फक्त हेच नाहीतर केळीच्या सालीमुळे अनेक आजार देखील बरे होण्यास मदत होते. (Banana peel is extremely beneficial for health)
पाचन तंत्र चांगले होते
केळीच्या सालामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते आणि नियमितपणे केळीच्या सालीचे सेवन केल्याने पाचन तंत्रामध्ये सुधारणा होते. हे बद्धकोष्ठता आणि अतिसाराच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. आपण नियमितपणे केळीची साल खाल्ली पाहिजे.
डार्क सर्कल्स
आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली असतील तर ती समस्या दूर करण्यासाठी आपण केळीची साल वापरू शकतो. यासाठी केळीच्या सालीमध्ये कोरफड मिक्स करा आणि ते चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनी पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून 3 दिवस हा उपाय करून पहा.
दात स्वच्छ करते
तज्ञांच्या मते, आठ दिवसामधून एकदा जर केळीची साल आपण दातांवर चोळली तर दात चमकतात. केळीची साल पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध आहे. यामुळे दातांवरील पिवळेपणा जाण्यास मदत होते.
केळीच्या सालीचा स्क्रब
केळीची साल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आपण केळीची साल वापरू शकता. यासाठी 3 चमचे साखर, ओटचे पीठ, केळीच्या सालाची पूड घ्या. आता या तीन गोष्टी ग्राइंडरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर पाण्याने धुवा.
वेदना कमी होतात
एका अभ्यासानुसार केळीच्या सालामध्ये बायोएक्टिव्ह संयुगे असतात. ज्यात कॅरोटीनोईड्स आणि पॉलीफेनॉल आहे. हे अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांसह समृद्ध आहे जे पोटदुखीपासून मुक्त होण्यास मदत करते.
केळीच्या सालीचा आहारात अशाप्रकारे समावेश करा!
केळीचा सालीचा आहारात समावेश करण्यासाठी आपण सर्वात अगोदर केळीची साल स्वच्छ धुवून घा. एक ग्लास पाणी गॅसवर ठेवा आणि त्यामध्ये केळीची साल घाला आणि दहा मिनिटे हे पाणी चांगले उकळा आणि नंतर हे पाणी प्या. यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो. आपण केळीची साल मिक्सरमध्ये बारीक करून देखील आहारात घेऊ शकतो. दररोज सकाळी केळीच्या सालीची पावडर पाण्यात मिक्स करून पिल्याने आपले वजन कमी होण्यास देखील मदत होते.
संबंधित बातम्या :
पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!
Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!
Health | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
(Banana peel is extremely beneficial for health)