मुंबई : काळी मिरी अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरली जाते. हे केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यात अनेक पोषक घटक असतात. यात बॅक्टेरियाविरोधी आणि दाहक -विरोधी गुणधर्म आहेत. हे संसर्ग दूर ठेवण्यास मदत करतात.
या व्यतिरिक्त, त्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत.
जळजळ कमी करण्यासाठी आणि दुखापतीच्या वेदना कमी करण्यासाठी हे फायदेशीर आहे. काळी मिरी मुख्यतः सूप, चहा आणि डेकोक्शन्स इत्यादींमध्ये समाविष्ट केली जाते. आपण काळी मिरीचे पाणी देखील घेऊ शकता, त्याचे आरोग्य फायदे जाणून घेऊया.
काळी मिरीचे पाणी कसे बनवायचे
सर्वप्रथम 2-3 काळी मिरीचे दाणे घ्या आणि ते एक कप पाण्यात उकळा. जेव्हा पाण्याचा रंग बदलू लागतो तेव्हा ते एका कपमध्ये ओता आणि प्या.
आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
संशोधनात असे दिसून आले आहे की, काळी मिरी आतड्यातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारते. हे नैसर्गिकरित्या शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास देखील मदत करते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत
काळी मिरीमध्ये असलेल्या घटकांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. विशेष म्हणजे या कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यत आहे.
अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध
एका अभ्यासानुसार, काळी मिरीमध्ये भरपूर पिपेरिन असते. हा एक घटक आहे ज्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. हे मुक्त रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळण्यास मदत करते.
वजन कमी करण्यास मदत करते
या खास पेयामुळे आपले वजन कमी होण्यास मदत मिळते. अनेक लोक सकाळच्या दिनक्रमाचा भाग म्हणून पाणी पितात. या पाण्यात एक चिमूटभर काळी मिरी पावडर टाकल्याने फायदे वाढतील. हे दोघे मिळून चयापचय वाढवू शकते. जे पचन सुधारते आणि कॅलरी बर्न करते.
पचनामध्ये मदत करते
जर तुम्ही अपचनाने त्रस्त असाल तर काळी मिरीचे पाणी प्या. यात पाचन एंजाइम असतात जे पचन करण्यास मदत करतात. त्याचा स्वादुपिंडाच्या एन्झाइम्सवर फायदेशीर प्रभाव पडतो, जो एकूण पाचन प्रक्रिया वाढवते.
हायड्रेटेड राहण्यास मदत
गरम पाणी आणि काळी मिरी यांचे मिश्रण आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. इतर फायद्यांप्रमाणे, ते त्वचेच्या पेशी पुन्हा भरून कोरडेपणा बरे करते. यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता. तसेच त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Black Pepper Water is beneficial for boosting the immune system)