मुंबई : मस्त गरमा गरम कडक चहाच्या (Tea) कपाने दिवसाची सुरूवात करायला कोणाला आवडत नाही. बरेचजण तर सकाळी ब्रेड टी देखील घेतात. मात्र, रिकाम्या पोटी चहा घेणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. असे डॉक्टर आणि तज्ज्ञांनी वारंवार सांगितले आहे. रिकाम्या पोटी कोणताही चहा प्यायल्यास अॅसिडिटीची (Acidity) शक्यता वाढते. याचे एकमेव कारण म्हणजे चहामध्ये असलेले कॅफिन. त्यामुळे मॉर्निंग वॉक करून घरी परतताना एक कप चहा अजिबात घेऊ नका. जर तुम्हाला सकाळी चहा पिण्याची इच्छा असेल तर तुम्ही चहासोबत बिस्किट नक्की खा. अन्यथा गॅस्ट्रिकचा त्रास वाढेल. दूधाचा चहा घेणे मुळात आरोग्यासाठी (Health) चांगलेच नाहीये. हा चहा प्यायल्यानंतर शरीरामध्ये अनेक आजार येतात.
आजकाल ओलांग टी, सिल्व्हर नीडल टी, अर्ल टी, ग्रीन टी यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सर्व चहामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आता बरेच लोक आले, काळी मिरी आणि कच्ची हळद मिसळून सकाळचा चहा खातात. यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते, तसेच अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. तसेच काळा चहा पिणे देखील आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. चला काळ्या चहाचे फायदे जाणून घेऊयात.
ज्यांना नियमितपणे गॅस, छातीत जळजळ किंवा पोटाचा त्रास होत असेल त्यांनी दुधाचा चहा पिणे बंद करून काळा चहा प्यावा. या चहामुळे शरीर निरोगी राहील. एकापेक्षा जास्त समस्या दूर होतील. सकाळी दुधाचा चहा प्यायल्याने यकृताचा त्रास होतो. आणि म्हणून ज्यांना फॅटी लिव्हरची समस्या आहे त्यांनी दुधाचा चहा अजिबात पिऊ नये. काळ्या चहाचे नियमित सेवन केल्यास शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. हा चहा चांगला डिटॉक्सिफिकेशन करण्यास मदत करतो.