मुंबई : स्मूदी हे एक स्वादिष्ट पेय आहे. हे ताजी फळं किंवा भाज्यांसोबत दूध किंवा दही मिसळून बनवलं जातं. (Breakfast Recipes) हे स्वादिष्ट आणि मलाईदार पेय सहसा थंड दिलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे हे खूप चवदार आहे. जर तुम्ही चहा किंवा कॉफी तुम्ही घेत नसाल तर फळांची स्मूदी तुम्ही घेऊ शकतात. हे एक अतिशय निरोगी पेय आहे. हे बनवणं सोपं आहे. चला जाणून घेऊया तुम्ही सकाळी कोणत्या स्मूदीचं सेवन करू शकता.
केळी आणि अक्रोडची स्मूदी – दिवस सुरू करण्यासाठी आपल्याला उर्जेची आवश्यकता असते. लोह आणि पोटॅशियम समृद्ध, केळी अक्रोड, मध आणि दही मिसळून तुम्ही सकाळी त्याचे सेवन करू शकता. हे एक निरोगी पेय आहे.
आंबा आणि नारळाची स्मूदी – आंबा हे रसाळ फळ आहे. पोषक तत्वांनी युक्त नारळाचं दूध आणि आंब्यासह तुम्ही हेल्दी स्मूदी बनवू शकता. यामध्ये ओट्स आणि ड्राय फ्रूट्सचाही समावेश आहे. ते तयार करण्यासाठी 15 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो.
खरबूज आणि किवी स्मूदी – गोड सुगंधित खरबूज, किवी, दूध आणि मधाने बनवलेले हे एक स्वादिष्ट पॉवर शेक आहे. तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड ठेवण्यासाठी हे स्वादिष्ट स्मूदी हे परिपूर्ण पेय आहे.
केळी ओट्स स्मूदी – हा नाश्ता तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. ही उच्च प्रथिने असलेली स्मूदी हळद, दालचिनी आणि मध, केळी आणि ओट्सपासून बनवली जाते. हे पोषक तत्वांनी समृद्ध आहे. ते बनवण्यासाठी 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो.
ओट्स आणि मँगो स्मूथी – या पौष्टिक आणि ताज्या रेसिपीमध्ये गोड आंबा, दूध आणि कुरकुरीत बदाम ओट्समध्ये मिसळलेलं असतं. या मिश्रणात जाड दहीही घातले जाते.
बदाम आलं आणि कस्टर्ड अॅपल स्मूदी – आलं, बदाम आणि हिरवी वेलची सारख्या घटकांचा वापर करून ही निरोगी स्मूदी बनवली जाते. हे कस्टर्ड सफरचंद आणि दुधापासून बनवले जाते.
संबंधित बातम्या
Weight Loss Diet | झटपट वजन कमी करण्यासाठी फॉलो करा लो-कार्ब डाएट, आरोग्यासाठीही ठरेल फायदेशीर!
Yoga Poses : ताणतणावापासून मुक्त आणि स्लिमट्रीम राहायचंय?; महिलांनो, ही 5 योगासनं नियमित करा