मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी जवळपास सर्वचजण प्रयत्न करत आहेत. मात्र, अनेक उपाय करूनही वजन कमी होत नाहीये, अशी अनेकांची तक्रार आहे. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन काही दिवसांमध्येच कमी होईल. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला काही विशेष प्रयत्न देखील करण्याची गरज नाहीये. (Capsicum is beneficial for weight loss)
वजन कमी करण्यासाठी शिमला मिरची अत्यंत फायदेशीर आहे. आपण आपल्या दररोजच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश केला तर आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होईल. शिमला मिरचीमध्ये कॅलरी असतात, त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही. व्हिटॅमिन सीचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत होते. यामुळे आहारात जास्त-जास्त हिरवी शिमला मिरचीचा समावेश करा.
शिमला मिर्ची खाल्ल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते. बाजारात हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगाच्या शिमला मिरची मिळतात. शिमला मिरची एंटी-ऑक्सिडेंट, अँटीइन्फ्लेमेटरी घटक आणि सल्फर, कॅरोटीनॉइड लाइकोपीन देखील असते. यामुळे कर्करोगासारख्या आजारांना टाळण्यासही फायदेशीर आहे. जर आपल्याला गुडघे आणि सांध्यामध्ये समस्या असतील तर शिमला मिर्ची सेवन करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
शिमला मिरची खाणे आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. आपल्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर आपण शिमला मिरची आहारात दररोज घेतली पाहिजे. त्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन सी लोह वाढवण्यास मदत करते. सर्वात मुख्य म्हणजे शिमला मिरची खाल्ल्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो. जरी आपल्याला मधुमेह नियंत्रित करायचा असेल तर, शिमला मिरची आपल्यासाठी उपयुक्त ठरेल.
संबंधित बातम्या :
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Hair Care | हिवाळ्याच्या दिवसांत कोंड्याच्या समस्येने हैराण? ‘हे’ घरगुती उपचार नक्की ट्राय करा!#haircare | #Dandruff | #HairProblems | #BeautySecrets https://t.co/CCKZp4C5hX
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 5, 2021
(Capsicum is beneficial for weight loss)