सध्याच्या सगळ्यांचेच आयुष्य धावपळीचे झाले आहे. या धावपळीच्या काळात आहाराकडे योग्य लक्ष दिले जात नाही. योग्य आहार नसल्यामुळे वजन वाढण्याची समस्या वाढली आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक लोक वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत. अनेक देशांमध्ये लठ्ठपणा ही गंभीर समस्या बनली आहे. आजच्या काळातील व्यस्त जीवन शैलीत आपण स्वतःच्या आहाराची योग्य काळजी घेऊ शकत नाही. त्यामुळे पोट आणि कमरेवरील चरबी झपाट्याने वाढू लागते.
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक जिमला जातात किंवा शारीरिक हालचाली करतात. पण वजन कमी करण्यासाठी हे पुरेसं नाही. वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून आरोग्यदायी गोष्टींचे सेवन करणे देखील तेवढेच गरजेचे आहे.
आंबट पदार्थांचे सेवन : शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लिंबू, संत्री आणि टँझरीन सामान्यतः विटामिन सी मिळवण्यासाठी खाल्ले जातात. परंतु ते वजन कमी करण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
मुळा : मुळा सामान्यतः हिवाळ्याच्या ऋतूमध्ये घेतला जातो. या ऋतूमध्ये मानवी शरीराची क्रिया कमी होते. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो म्हणूनच हिवाळ्यात मुळा खाणे आवश्यक असते. मुळ्यामध्ये कमी कॅलरी असतात ज्यामुळे चरबी वाढत नाही.
रताळे : रताळे रोज खाल्ल्याने तुमचे पोट भरलेले राहते. रताळे हे जमिनीत उगवले जाणारे एक उत्कृष्ट अन्न आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही आणि तुम्ही कमी आहार घेता. याशिवाय रताळ्यामध्ये फायबरचं प्रमाण देखील असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
सूप प्या : भारतात आपल्याला अनेक वेळा सॉलिड फूड खायला आवडते, ज्यामुळे त्याचे पचन उशीर होते आणि वजन देखील वाढते. त्या ऐवजी शक्य तितके सूप प्या. ज्यामुळे एकूण कॅलरीज वाढतील आणि पचन देखील चांगले राहील अशा परिस्थितीत वजन कमी करणे सोपे होईल.