Weight Loss : वजन कमी करण्यासाठी दालचिनी चहा प्या, ‘हे’ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर!

| Updated on: Sep 12, 2021 | 10:28 AM

वाढलेले वजन कमी करण्यासाठी जवळपास सर्वचजण प्रयत्न करत आहेत. आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, दालचिनी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दालचिनी हा एक जुना मसाला आहे. ज्याचा वापर चहामध्ये केला जाऊ शकतो.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी दालचिनी चहा प्या, हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर!
आरोग्य
Follow us on

मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी जवळपास सर्वचजण प्रयत्न करत आहेत. आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, दालचिनी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दालचिनी हा एक जुना मसाला आहे. ज्याचा वापर चहामध्ये केला जाऊ शकतो. दालचिनीचा चहा वाढलेले वजन कमी करण्यास मदत करतो. एवढेच नाही तर यामुळे थकवाही दूर होतो आणि चांगली झोप येते. (Cinnamon tea is beneficial for weight loss)

दालचिनीचे फायदे

दालचिनी हा असा मसाला आहे जो आपल्या अन्नामध्ये सुगंध जोडण्याबरोबरच त्याची चवही वाढवतो. करी, सूप, शेक, स्मूदीज बनवण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. दालचिनीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत, त्यामुळे ते रोग दूर होण्यास मदत मिळते. आयुर्वेदातही याचा वापर केला जातो.

दालचिनी नैसर्गिकरित्या इन्सुलिनची पातळी राखण्याचे काम करते. तसेच साखरेची पातळी राखण्यास मदत होते. दालचिनी हा सुगंधी मसाला चयापचय सुधारण्यास मदत करतो आणि जे वजन कमी करण्यास देखील फायदेशीर आहे. दालचिनीचे नेमके कोणते फायदे होतात, हे आज आपण बघणार आहोत.

हृदयासाठी फायदेशीर

तज्ञांच्या मते, चिमूटभर दालचिनी तुमच्या हृदयासाठी फायदेशीर आहे. ते पाण्यात, सॅलड, सूपमध्ये मिसळून तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता. हा मसाला अँटी-ऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे. जो शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो.

दालचिनी चहा कसा बनवायचा

दालचिनी चहा बनवण्यासाठी एका भांड्यात २ कप पाणी आणि अर्धा इंच दालचिनी आणि अर्धा इंच आले घ्या. जेव्हा मसाल्यांचा सुगंध येऊ लागतो, तेव्हा अर्धा चमचा ग्रीन टी घाला. चहा गाळून एक कप मध्ये ठेवा आणि वर एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळा.

याशिवाय तुम्हाला हवे असल्यास अडीच कप पाण्यात एक चमचा दालचिनी पावडर मिसळा. चहा गाळून घ्या आणि लिंबाचा रस आणि मध मिसळा. यात अँटी-ऑक्सिडंट आणि विरोधी दाहक गुणधर्म आहेत जे मज्जातंतूंना आराम करण्यास आणि झोपायला मदत करतात.

दालचिनी पावडर टाकून उकळलेले पाणी प्या

आपण मधुमेहाचे रुग्ण असल्यास आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवू इच्छित असल्यास आपण या सोप्या मार्गाने दालचिनी वापरू शकता. यासाठी तीन चमचे दालचिनी पावडर एक लिटर पाण्यात 20 मिनिटे उकळवा. त्यानंतर संपूर्ण दिवसभर हे पाणी प्या. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

संबंधित बातम्या : 

सावधान! तुमच्या औषधांच्या पाकिटावरही ‘लाल रेघ’ आहे? जाणून घ्या तिचा नेमका अर्थ…

Jaggery Health Benefits | गुळाचे हे फायदे जाणाल… तर रोज गूळ खाल!

(Cinnamon tea is beneficial for weight loss)