रात्री झोपण्यापूर्वी करा ‘या’ पेयाचे सेवन, मेंदूला मिळेल विश्रांती

| Updated on: Nov 15, 2024 | 8:00 AM

दररोज योग्य वेळी झोपणे आणि उठणे आवश्यक आहे. तसेच सात ते आठ तासांची झोप घेणे ही आवश्यक आहे. अन्यथा शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

रात्री झोपण्यापूर्वी करा या पेयाचे सेवन, मेंदूला मिळेल विश्रांती
Follow us on

मानसिक शांती मिळण्यासाठी आणि दिवस चांगला आनंददायी जाण्यासाठी रात्री चांगली झोप घेणे, हे अत्यंत गरजेचे असते. चांगली झोप म्हणजे उत्तम आरोग्य. दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. दिवसभर शारीरिक किंवा मानसिक काम केल्यानंतर शरीराला तसेच मेंदूला विश्रांतीची गरज असते. त्यासाठी चांगली झोप घेणे अत्यंत आवश्यक असते.

जेव्हा तुम्हाला नीट झोप येत नाही, तुम्हाला योग्य आराम मिळत नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात. काही लोकांना रात्री वारंवार जाग येण्याची समस्या असते. यामागे अनेक कारणे असू शकतात. ज्यामध्ये खोलीचं वातावरण थंड नसते, जास्त प्रमाणात प्रकाश नसणे किंवा जास्त प्रकाश असणे, तापमान खूप गरम किंवा थंड असणे. या गोष्टी समाविष्ट आहे. सध्या या सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवूनही झोपेत काही व्यत्यय येत असेल तर झोपण्यापूर्वी काही आरोग्यदायी पेय घेऊ शकतात, ज्याने चांगली झोप लागण्यास मदत होईल.

जर तुमची रात्री नीट झोप होत नसेल तर सकाळी तुमची चिडचिड होते. ही समस्या अशीच राहिल्यास तणाव वाढतो. चयापचय मंदावतो. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यताही वाढते आणि आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे दररोज योग्य वेळी झोपणे आणि उठणे आवश्यक आहे. तसेच सात ते आठ तासांची झोप घेणे ही आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया कोणते पेय तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत करतात.

कैमोमाइल चहा प्या : जर तुम्हाला रात्री वारंवार उठण्याची सवय असेल तर तुम्ही कैमोमाइल चहा पिऊ शकतात. त्यात एपीजेन नावाचा घटक आढळतो जो शांत झोपेला चालला देण्यासाठी उपयुक्त आहे.

हळद किंवा जायफळचे दूध : चांगल्या झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात हळद किंवा चिमूटभर जायफळ पावडर मिसळून प्यावे. काही लोक जायफळ घेऊ शकत नाही. यासाठी हळद हा उत्तम मार्ग मानला जातो. त्यामुळे तणाव कमी होईल, झोप सुधारेल आणि प्रतिकारशक्ती देखील वाढेल.

तुळशीची पाने टाकून चहा करा : तुम्ही तुळशीच्या पानांपासून चहा बनवून रात्री झोपण्यापूर्वी पिऊ शकतात. त्यामुळे तुमचे शरीर आणि तुमचे मन शांत होईल तसेच तुम्ही आरामात झोपू शकाल.

या गोष्टी नक्की करा

चांगल्या झोपेसाठी तुम्ही वेळेवर जेवण करणे आवश्यक आहे. रात्रीचे जेवण सात ते आठच्या दरम्यान घेणे चांगले. याशिवाय जेवणानंतर वीस मिनिटे नक्कीच शतापावली करायला हवी. झोपण्यापूर्वी चहा, कॉफीचे सेवन टाळा. झोपण्यापूर्वी काही वेळ कोमट पाण्यात पाय ठेवा आणि नंतर पायाच्या तळव्याला मसाज केल्याने ही झोप चांगली येण्यास मदत होते कारण कधी कधी पाय दुखत असल्याने पुन्हा जाग येते.