Food : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी काकडीच्या सूपचा आहारात समावेश करा, जाणून घ्या रेसिपी!

| Updated on: Apr 11, 2022 | 1:22 PM

कडक उन्हाळ्याला (Summer) आता सुरूवात झाली आहे. या हंगामामध्ये आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये स्वत: ला हायड्रेटेड (Hydrated) ठेवणे महत्वाचे आहे. हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये पाण्याबरोबर कलिंगडचा रस, काकडीचा रस वगैरे घेऊ शकता. याचे सेवन केल्याने आपल्याला ऊर्जा मिळते.

Food : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी काकडीच्या सूपचा आहारात समावेश करा, जाणून घ्या रेसिपी!
काकडीचा सूप आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : कडक उन्हाळ्याला (Summer) आता सुरूवात झाली आहे. या हंगामामध्ये आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये स्वत: ला हायड्रेटेड (Hydrated) ठेवणे महत्वाचे आहे. हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये पाण्याबरोबर कलिंगडचा रस, काकडीचा रस वगैरे घेऊ शकता. याचे सेवन केल्याने आपल्याला ऊर्जा मिळते. ते आपली प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यास मदत करतात. ते थकवा दूर करण्याचे काम करतात. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामात आपण काकडीच्या सूपचे सेवन करू शकतो, काकडीचा सूप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ते कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.

काकडीच्या सूपसाठी साहित्य

काकडी 1, लसूण 2 पाकळ्या, 1 कप पुदिन्याची पाने, एर कप दही, एक हिरवी मिरची, 2 चमचे ऑलिव्ह तेल, चवीनुसार मीठ, काळी मिरी, दूध हे सर्व साहित्य आपल्याला काकडीचा सूप तयार करण्यासाठी लागेल.

काकडीचा सूप कसा बनवायचा जाणून घ्या

सूप बनवण्यासाठी सर्वात अगोदर काकडीचे तुकडे करा. यानंतर ब्लेंडरमध्ये लसूण, पुदिना, हिरवी मिरची, दही आणि 1/2 कप दूध घाला. यानंतर 2 चमचे ऑलिव्ह तेल आणि चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला. आता मिश्रण मिळेपर्यंत सर्व साहित्य एकत्र करा. त्यानंतर वीस मिनिटे हे सर्व मंद गॅसवर गरम करून घ्या. त्यानंतर आता एका काचेच्या बाऊलमध्ये हे काढा आणि वरती एक काकडीचा तुकडा ठेवा. गरमा गरमा हे आता सर्व्ह करा.

वाचा काकडीमधील घटक

काकडीत व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक फ्लेव्होनॉइड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि फॉस्फरस यांसारखे अनेक पोषक घटक असतात. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ते आपली पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देते, त्यात खूप कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे. त्यांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये काकडीच्या सूपचा समावेश करावा. तसेच हा सूप उन्हाळ्यामध्ये देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

संंबंधित बातम्या :

Health : आयुष्यातून या 3 गोष्टी कायमच्या आऊट करा आणि जीवन बघा कसे सुंदर होते!

Health Care Tips : उन्हाळ्यात हे ड्रायफ्रूट्स भिजवलेले खा आणि निरोगी राहा!