मुंबई : प्रसिध्द गायक केके (KK) यांच्या अशा जाण्याने प्रत्येकजणच हैराण आहे. केकेचा मृत्यू सर्वांनाच धक्कादायक आणि अस्वस्थ करणाराच आहे. निरोगी जीवनशैली जगणाऱ्या केके यांचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) मृत्यू झाला असा विश्वास केकेच्या जवळच्या व्यक्तींना बसत नाहीयेत. कारण केके हे अत्यंत हेल्दी लाइफस्टाईल जगत होते. इतकेच काय तर मसालेदार, तेलकट, तूपकट आणि बाहेरील खाद्यपदार्थांपासून केके शक्यतो दूरच असायचे. केकेच्या मृत्यूनंतर प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. व्यायाम (Exercise) केके न चुकता करत असत. मग इतके सर्व करूनही केके यांना हृदयविकाराच्या झटका कसा येऊ शकतो, असा प्रश्न केकेच्या फॅन्सला पडला आहे.
कोलकाता येथील एका कॉलेजमध्ये केके यांचा जबरदस्त लाईव्ह परफॉर्मन्स चालू होता. सर्वजण केकेच्या सुपरहिट गाण्यांवर डान्स करत होते. मात्र, तिथे असणाऱ्यांना काय माहिती होते, की हा केके यांचा शेवटचा परफॉर्मन्स आहे. प्राथमिक तपासात केके यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे. केके यांनी तंदुरुस्त राहण्यासाठी एक खास डाएट प्लॅनच तयार केला होता. तेलकट आणि मसालेदार पदार्थ ते कधीही खात नसत. फक्त प्रवासा दरम्यान फक्त चीट डे करायचे. तसेच दारू किंवा धूम्रपान हे देखील केके कधीच करत नव्हते. मधुमेह किंवा बीपी वगैरे अशा कुठल्याही आरोग्य समस्या केके यांना कधीच नव्हत्या.
केके यांनी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी आणि बंगाली यासह इतर भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत. केके यांच्या अशा अचानक जाण्याचे अनेक तर्कविर्तक वर्तवले जात आहेत. केकेला कोरोनाची लागण तर झाली नाही ना असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता, मात्र, केकेच्या जवळच्या मित्राने सांगितले की, केकेला कोरोनाची लागण नव्हती झाली. असेही सांगितले जात आहे की, कोलकातामधील परफॉर्मन्स वेळी काही वेळ एअर कंडिशनिंग यंत्रणा व्यवस्थित सुरु होती. मात्र, काही वेळानंतर बंद करण्यात आली होती आणि केकेने एसी चालू करायला सांगितले होते असे चाहत्याचे म्हणणे आहे.