Diwali Recipe 2021: ‘या’ दिवाळीमध्ये घरी तयार करा खास कलाकंद, जाणून घ्या रेसिपी!

| Updated on: Nov 01, 2021 | 8:33 AM

दिवाळी हा सण आनंदाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. दिवाळीनिमित्त घरोघरी अनेक पदार्थ बनवले जातात. आजच्या कोरोनाच्या काळात बाहेरील पदार्थ आणण्यापेक्षा घरी वेगवेगळे पदार्थ तयार करण्यावर जास्त भर दिला जात आहे. आज आम्ही तुम्हाला एक खास रेसिपी सांगणार आहोत. जी तुम्ही तुमच्या घरी अगदी सहज बनवू शकता.

Diwali Recipe 2021: या दिवाळीमध्ये घरी तयार करा खास कलाकंद, जाणून घ्या रेसिपी!
कलाकंद
Follow us on

मुंबई : दिवाळी हा सण आनंदाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. दिवाळीनिमित्त घरोघरी अनेक पदार्थ बनवले जातात. आजच्या कोरोनाच्या काळात बाहेरील पदार्थ आणण्यापेक्षा घरी वेगवेगळे पदार्थ तयार करण्यावर जास्त भर दिला जात आहे. आज आम्ही तुम्हाला एक खास रेसिपी सांगणार आहोत. जी तुम्ही तुमच्या घरी अगदी सहज बनवू शकता. कलाकंद जसे चविष्ट गोड आहे तसेच ते खूप आरोग्यदायी आहे. चला जाणून खास पध्दतीने घरी कलाकंद कसे तयार करायचे.

साहित्य

पनीर – 250 ग्रॅम

खवा – 250 ग्रॅम

मलई – 1 कप

दूध – 1/2 कप

साखर – 1 1/2 कप

वेलची पावडर – 1 टीस्पून

पिस्ता-बदाम बारीक चिरून – 2 टीस्पून

1 चमचा तूप

तयार करण्याची पध्दत-

कलाकंद बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीर आणि मावा मॅश करा आणि नंतर मिक्स करा. यानंतर या संपूर्ण मिश्रणात दूध आणि मलई चांगली मिसळा. नंतर कढईत तूप गरम करा. त्यात तयार मिश्रण टाका. नंतर मध्यम आचेवर चांगले भाजून घ्या.

हे सर्व साहित्य नीट मिसळून झाल्यावर त्यात साखर घालून थोडे पाणी घाला. साखर पूर्णपणे विरघळून मिश्रण कोरडे झाल्यावर त्यात वेलची पूड घाला. हे शिजलेले मिश्रण एका मोठ्या ताटात ठेवण्याच्या अगोदर तूप लावा. यानंतर ते चौकोनी आकारात कापून ड्रायफ्रूटने सजवा. नंतर ते फ्रीजमध्ये ठेवा. या दिवाळीत तुम्ही एकदा तुमच्या घरी ही मिठाई नक्की तयार करा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Diwali Recipe 2021 Make special kalakand at home for Diwali, see recipe)