मुंबई : पूर्वीच्या काळात बहुतांश लोक लहानपणी दोरीवरच्या उड्या मारत असत. त्यावेळी तो मनोरंजनाचा एक मार्ग होता. पण आजच्या काळात दोरीवरच्या उड्या मारणे तुमच्यासाठी एक उत्तम फिटनेस व्यायाम आहे. जर तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही दोरीवरच्या उड्या मारल्या पाहिजेत. जर तासन्तास शारीरिक व्यायामासाठी वेळ मिळत नसेल, तर तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच व्यायाम म्हणून काही काळ दोरीवर उडया मारल्या पाहिजेत. (Do this special exercise and lose weight)
1. फक्त काही मिनिटांसाठी दोरीवरच्या उड्या मारल्याने भरपूर कॅलरी बर्न होतात, म्हणून ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे. जर तुम्ही संतुलित आहारासह दोरीवर उडी मारण्याचा व्यायाम केला तर तुमचे वजनही कमी होते आणि तुम्हीही या व्यायामाचा आनंद घ्या.
2. जर एखाद्या व्यक्तीने रोज काही काळ दोरीवरच्या उड्या मारल्या तर त्याच्या शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारतो. यामुळे हार्ट स्ट्रोक आणि इतर हृदयरोगाचा धोका कमी होतो. हे एक चांगले कार्डिओ व्यायाम देखील मानला जातो. यामुळे दोरीवरच्या उड्या दररोज मारल्या पाहिजेत.
3. दोरीवरच्या उड्यांमुळे शरीराचे संतुलन सुधारते. यासह, शारीरिक ऊर्जा वाढते. पायांसाठी हा एक चांगला व्यायाम देखील मानला जातो. दोरीने उडी मारल्याने पाय आणि जांघांमध्ये वेदना आणि जडपणा दूर होतो. स्नायू मजबूत होतात.
4. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या उंचीची चिंता असेल तर तुम्ही मुलांना रोज दोरीवर उडी मारण्यास प्रवृत्त केले पाहिजे. यामुळे, पाठीचे, मनक्याचे आणि पायांचे स्नायू ताणले जातात आणि नवीन स्नायू देखील तयार होतात. यामुळे उंची वाढण्यास मदत होते.
या लोकांनी दोरीवरच्या उड्या मारणे टाळा
1. जर तुम्हाला दम्याचा आजार असेल किंवा फुफ्फुसाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तज्ञांच्या सल्ल्याशिवाय दोरीवर उडी मारण्याची चूक कधीही करू नका. यामुळे समस्या वाढू शकतात.
2. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनीही तज्ञांचे मत घेतल्यानंतरच दोरीवरच्या उड्या मारल्या नाही पाहिजेत. डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय दोरी खेळू नका.
4. जर सांधेदुखीची समस्या असेल तर दोरी उडी मारण्याची चूक करू नका.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतील ‘ही’ योगासने, तुम्हीदेखील नक्की ट्राय करा!#beautytips | #skincare | #yoga | #beauty https://t.co/zqbiogPSVT
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
(Do this special exercise and lose weight)