वाढलेले वजन कमी करण्यासाठी ओवा, जिरे आणि काळी मिरीचे खास पेय प्या, वाचा!

| Updated on: Jul 13, 2021 | 12:33 PM

वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. कारण आपण योग्य पध्दतीने व्यायाम आणि डाएट करत नाहीत.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी ओवा, जिरे आणि काळी मिरीचे खास पेय प्या, वाचा!
वजन कमी करण्यासाठी खास पेय
Follow us on

मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. मात्र, वजन कमी होत नाही. कारण आपण योग्य पध्दतीने व्यायाम आणि डाएट करत नाहीत. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, आपण काय खातो आणि पितो. वजन कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खाय पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन झटपट कमी होईल. (Drink a special drink of Ajwain, cumin and black pepper to lose weight)

वाढलेले वजन कमी करण्यासाठी ओवा, जिरे आणि काळी मिरीचे खास पेय अत्यंत फायदेशीर आहे. हे पेय घरी तयार करण्यासाठी आपल्याला 1 चमचा जिरे, 2 चमचे ओवा आणि 1 चमचा काळी मिरी लागणार आहे. हे पेय तयार करण्यासाठी सर्वात अगोदर दोन ग्लास पाणी घ्या आणि त्यामध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करा. साधारण वीस मिनिटे हे पाणी चांगेल उकळूद्या आणि प्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होईल.

3 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरे, 4 चमचे गुळाची पावडर, 3 चमचे ग्रीन टी, 1 चमचा मध, 2 चमचे आद्रक पावडर, 3 चमचे दालचिनी आणि 1 चमचे लिंबाचा रस लागणार आहे, वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून फक्त लिंबाचा रस सोडून बाकी सर्व मिक्स करून घ्या. त्यानंतर हे साहित्य तीन ग्लास पाण्यामध्ये मिक्स करा आणि साधारण तीस मिनिटे मंद आचेवर गॅसवर ठेवा.वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात जास्तीत-जास्त प्रमाणात हिरव्या भाज्या घ्या.

यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तसंच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भाज्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात.

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!

Hair Care | केसांची निगा राखण्यासाठी सोनम कपूरच्या टिप्स, तुम्हीही एकदा ट्राय करून पाहा!

(Drink a special drink of Ajwain, cumin and black pepper to lose weight)