मुंबई : वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. कारण आपण योग्य पध्दतीने व्यायाम आणि डाएट करत नाहीत. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, आपण काय खातो आणि पितो. वजन कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खाय पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन झटपट कमी होईल.(Drink a special drink of lemon and ginger and lose weight)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी काकडी, लिंबू आणि आद्रकचे खास पेय तयार करा, यामुळे आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होईल. हे पेय तयार करण्यासाठी एक काकडी, दोन चमचे आद्रकचा रस आणि एक चमचा लिंबाचा रस लागणार आहे. यासाठी एक ग्लास पाणी घ्या आणि त्यामध्ये आद्रकचा रस सर्वात अगोदर टाका आणि मंद आचेवर गरम होईद्या. त्यानंतर त्यामध्ये काकडीची बारीक केलेली पेस्ट मिक्स करा आणि काही वेळ उकळूद्या.
त्यानंतर शेवटी या पेयामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि गॅस बंद करा. हे पेय गरम असतानाच प्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होईल. दररोज 10 ग्रॅम मेथीचे सेवन केले, तर शरीरावरची चरबी कमी होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यांमध्ये विद्रव्य फायबर आणि ग्लूकोमोनास फायबर असते. ते आतड्यांमधून ग्लूकोज शोषून घेण्यास आणि मधुमेह नियंत्रित करण्याचे कार्य करतात. याव्यतिरिक्त, मेथीमधील अल्कॉइड्समुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण सुधारते आणि ग्लाइसेमिक पातळी कमी होते.
यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आहारामध्ये मेथी घेणे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी कॅलरी कमी करणे खूप महत्वाचे आहे. प्रथिनांप्रमाणेच कार्ब देखील शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत कारण ते ऊर्जा आणि फायबरचे मुख्य स्रोत आहेत. वयाच्या 40 व्या वर्षी शरीरात बरेच बदल होतात. या दरम्यान, शरीरात पौष्टिक अन्नाच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते. आपण जर ग्रीन टीमध्ये लिंबाचा रस आणि पुदिनाची पाने मिक्स करून पिले तर आपले वजन कमी होण्यास मदत होते.
संबंधित बातम्या :
Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!
Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Drink a special drink of lemon and ginger and lose weight)