मुंबई : प्रत्येकजण लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारचे व्यायाम, डायट आणि उपचार देखील घेतो. परंतु आपणास हे माहित नाही की, आपल्याला फिट आणि फाईन राहण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करायचा असेल तर आपण आपल्या आहारात काही बदल केले पाहिजे. ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत मिळते. (Drink by mixing lemon and honey in lukewarm water to lose weight)
लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबू मिक्स करून पिले पाहिजे. ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी देखील मध खूप उपयुक्त आहे. त्यात अजिबात चरबी नसते. याशिवाय मध कोलेस्टेरॉलची पातळी देखील नियंत्रित करतो. वजन कमी करण्यासाठी आपण कोमट पाण्यामध्ये मध, लिंबू मिसळून, ते पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी काकडी, लिंबू आणि आद्रकचे खास पेय तयार करा, यामुळे आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होईल. हे पेय तयार करण्यासाठी एक काकडी, दोन चमचे आद्रकचा रस आणि एक चमचा लिंबाचा रस लागणार आहे. यासाठी एक ग्लास पाणी घ्या आणि त्यामध्ये आद्रकचा रस सर्वात अगोदर टाका आणि मंद आचेवर गरम होईद्या. त्यानंतर त्यामध्ये काकडीची बारीक केलेली पेस्ट मिक्स करा आणि काही वेळ उकळूद्या.
शेवटी या पेयामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि गॅस बंद करा. हे पेय गरम असतानाच प्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होईल. दररोज 10 ग्रॅम मेथीचे सेवन केले, तर शरीरावरची चरबी कमी होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यांमध्ये विद्रव्य फायबर आणि ग्लूकोमोनास फायबर असते. ते आतड्यांमधून ग्लूकोज शोषून घेण्यास आणि मधुमेह नियंत्रित करण्याचे कार्य करतात.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Drink by mixing lemon and honey in lukewarm water to lose weight)