Isabgol With Milk: दुधात मिसळून प्या हा पदार्थ, मिळतील अनेक फायदे

| Updated on: Jul 27, 2022 | 3:56 PM

दूध हे तब्येतीसाठी फायदेशीर असते, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. दुधाचे पोषण वाढावे , यासाठी आपण त्यात अनेक पदार्थ मिसळून ते पिऊ शकतो.

Isabgol With Milk: दुधात मिसळून प्या हा पदार्थ, मिळतील अनेक फायदे
दुधात मिसळून प्या हा पदार्थ, मिळतील अनेक फायदे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : दूध (Milk) हे आरोग्यासाठी फायदेशीर असते, त्यामध्ये खूप पोषक तत्वे असतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. दुधामुळे सर्वांगिण विकास होतो. आणि त्याच दुधाचे आणखी पोषण वाढावे , यासाठी आपण त्यात अनेक पदार्थ मिसळून ते पिऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका पदार्थाविषयी सांगणार आहोत, जे दुधात मिसळून प्यायल्याने शरीराला भरपूर फायदे (Benefits of Isabgol) मिळतात. इसबगोल हे एक असे हर्ब आहे, जे आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाते. इंग्रजीत त्याचे सायलियम हस्क (Psyllium Husk) असे नाव आहे. पोटाशी संबंधित समस्येमुळे त्रास होत असेल तर इसबगोलच्या सेवनामुळे आराम मिळतो. इसबगोल दुधात मिसळून प्यायल्याने पचनाची समस्या, ब्लड शुगर यासारखे अनेक त्रास दूर होऊ शकतात. इसबगोलमध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिनसह अनेक पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असतात.

ब्लड शुगर

शरीरातील रक्ताचे साखरेचे प्रमाण वाढणे हे चांगले लक्षण नाही. साखरेचे प्रमाण वाढले की मधुमेह होतो. आजकाल बहुसंख्य लोकांना हा आजार होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी रोज दुधात इसबगोल मिसळून पिणे फायदेशीर ठरते. त्यामध्ये असलेले जिलेटिन ब्लड शुगर नियंत्रित करण्यास मदत करते.

डायरिया

जर तुम्ही डायरियामुळे (अतिसार) त्रस्त असाल, तर इसबगोलचे सेवन केले पाहिजे. इसबगोल दूधात मिसळून ते प्यायल्याने डायरियाच्या रुग्णांना आराम पडू शकतो. इसबगोल हे एकंदरितच पचन व पोटासाठी खूप फायदेशीर आहे.

हे सुद्धा वाचा

हृदय

हृदय आपल्या शरीरातील महत्वपूर्ण अवयव आहे. त्याचे कार्य सुरळीतपणे चालू राहणे हे गरजेचे आहे. आणि त्यासाठी सकस व पौष्टिक आहार महत्वाचा आहे . हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यासाठी आणि हृदय निरोगी व तंदुरूस्त ठेवण्यासाठी इसबगोलच्या सेवनाने खूप मदत होते. इसबगोल मधील घटकांमुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो.

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठता ही पचनाची गंभीर समस्या आहे. अवेळी केलेला अनियंत्रित आहार, व्यस्त जीवनशैली यामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी इसबगोल दुधात मिसळून पिणे खूप फायदेशीर आहे. त्याने बद्धकोष्ठतेची समस्या तर दूर होतेच पण पचनही सुधारते.

जाडेपणा / वजन कमी करण्यासाठी

अनियमित आहार, जंक फूड आणि खराब जीवनशैली यामुळे आजच्या काळात अनेकांना स्थूलपणाचा किंवा जाडेपणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. वाढत्या वजनामुळे शरीराच्या इतर भागांवर दाब पडून त्यांचे दुखणेही सुरू होते. वजन कमी करताना शास्त्रशुद्ध पद्धतीने कमी करावे, त्यातील आहार हा शरीरासाठी पोषक असावा. वजन कमी करण्यासाठी इसबगोल व दुधाचे सेवन फायदेशीर ठरते.

(टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)