मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी नुसत्या व्यायाम करून काही विशेष फायदा होत नाही. त्यासाठी आपल्याला खाण्यावर देखील विशेष लक्ष द्यावे लागते. वाढलेले वजन अनेक आजारांना निमंत्रणच देत असते. यामुळे वजन कमी करणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण दररोज सकाळी उपाशी पोटी एक खास पेय घेतले तर आपले वजन कमी होण्यास नक्की मदत होईल. (Drink this special drink to lose weight fast)
हे खास पेय घरी तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे इलायची, एक चमचा हिंग, एक चमचा जिरे, एक चमचा काळी मिरी आणि दोन चमचे मध लागणार आहे. हे पेय तयार करण्यासाठी फक्त मध सोडून इतर सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि एक ग्लास पाण्यात टाका. त्यानंतर वीस मिनिटे हे पाणी चांगले उकळूद्या. त्यानंतर हे पाणी गरम असतानाच प्या. ज्यामुळे आपले वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण दररोज रिकाम्या पोटी लसूण, गूळ आणि आद्रकचे पाणी पिले पाहिजे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला लसूणच्या सात ते आठ पाकळ्या, आद्रक आणि गूळ लागणार आहे. सर्वात अगोदर दोन ग्लास पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये लसूण आद्रक आणि गूळ मिक्स करा. हे पाणी उकळल्यानंतर गरम असतानाच प्या. यामुळे आपल्या शरीरातील चरबी बर्न होण्यास मदत होते.
एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा जिरे पावडर मिसळा आणि रिकाम्या पोटी प्या. जिरे केवळ अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनीच भरलेले नसून ते अँटीऑक्सिडंट्सचा एक उत्कृष्ट स्त्रोत देखील आहे. दीर्घ काळापासून लठ्ठपणामुळे होणारी जळजळ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांशी जोडली गेली आहे आणि यामुळे स्वयंप्रतिकारक परिस्थिती देखील उद्भवू शकते. जिरे पाणी पाचन फायद्यासाठी देखील ओळखले जाते.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Winter Diet | थंडीच्या दिवसांत रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांच्या सेवनाने राहील शरीर तंदुरुस्त!https://t.co/Znr5WfzLhp#Winter #diet #Food #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020
(Drink this special drink to lose weight fast)