मुंबई : सुकामेवा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जेंव्हा सुकामेवाचा विषय येतो, त्यावेळी आपल्याला सर्वात अगोदर आठवण होते ती म्हणजे अक्रोडची. कारण अक्रोड हे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अक्रोडचे अनेक फायदे आहेत जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. विशेषतः अक्रोडाचा मेंदूच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो.
भिजवलेले अक्रोड गुणकारी
वाळलेल्या अक्रोडांपेक्षा भिजवलेले अक्रोड जास्त प्रभावी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अभ्यासात असे दिसून आले आहे की अक्रोड किंवा काजू भिजवल्याने पचन लवकर होतात. अशावेळी भिजवलेले अक्रोड जास्त गुणकारी असतात. तज्ज्ञांच्या मते, दररोज भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने टाइप 2 मधुमेहावर चांगला परिणाम होतो. अक्रोड हे फायबर समृद्ध आहे. जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते.
अक्रोडमुळे साखरेची पातळी अचानक वाढण्याची शक्यता कमी होते. तसेच ग्लायसेमिक इंडेक्समध्ये भिजवलेले अक्रोड फक्त 15 आहे, याचा अर्थ ते मधुमेहासाठी अधिक प्रभावी आहे. हे देखील सिद्ध झाले आहे की अक्रोड इन्सुलिन प्रतिरोधक म्हणून कार्य करते. अक्रोडमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड सारख्या निरोगी चरबी असतात. जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. अक्रोडमध्ये नैसर्गिक तेलही भरपूर असते. जे त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर असते.
त्वचेसाठी फायदेशीर
अक्रोड जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे आणि अक्रोडाचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. अक्रोडच्या झाडाच्या सालातून तयार केलेली पेस्ट ही हिरड्या आणि दातांच्या इतर समस्यांवरील उपचारांसाठी वापरली जाते. अक्रोडाची पावडर घ्या आणि त्यात दुध टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. 10 मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे त्वचा तजेलदार वाटेल आणि चेहऱ्याचा ग्लो देखील वाढेल.
संबंधित बातम्या :
Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…
High Blood Pressure | केवळ मीठच नव्हे, उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी चुकनही खाऊ नयेत ‘या’ गोष्टी!