Health Tips : बदाम खालल्याने मधुमेह आणि कोलस्ट्रोलचा धोका होईल कमी, वाचा अभ्यास काय म्हणतो

| Updated on: Jul 13, 2021 | 11:10 AM

खराब जीवनशैलीमुळे अगदी कमी वयातच आपल्याला आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. गेल्या काही वर्षांत मधुमेह आणि प्री-डायबिटीजच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.

Health Tips : बदाम खालल्याने मधुमेह आणि कोलस्ट्रोलचा धोका होईल कमी, वाचा अभ्यास काय म्हणतो
बदाम
Follow us on

मुंबई : खराब जीवनशैलीमुळे अगदी कमी वयातच आपल्याला आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. गेल्या काही वर्षांत मधुमेह आणि प्री-डायबिटीजच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. यामागे वाईट जीवनशैली हे एक मुख्य कारण आहे. एका नवीन अभ्यासानुसार, आपण दररोज बदाम खाल्ले पाहिजेत. ज्यामुळे चयापचय सुधारण्यास मदत होते. तसेच बदाम खाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. (Eating almonds reduces the risk of diabetes and cholesterol)

मुंबईतील 16-25 वयोगटातील लोकांवर संशोधन केले गेले. ही चाचणी 257 लोकांवर केली गेली ज्यांचे ग्लूकोज चयापचय बिघडलेले होते. सर्वप्रथम, या लोकांची उंची, वजन, कंबर आणि हिप क्षेत्र मोजले गेले. यानंतर त्यांची ग्लूकोज सहनशीलता चाचणी आणि लिपिड प्रोफाइल चाचणी घेण्यात आली.

एका गटाला खाण्यासाठी बदामांची चांगली मात्रा दिली गेली होती तर दुसर्‍या गटास स्नॅक्स म्हणून बदाम देण्यात आले होते. संशोधनात असे आढळले आहे की, बदाम खाण्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतात आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

मधुमेहाचा धोका कसा कमी करावा
बदाम मॅग्नेशियम समृद्ध असतात, जे टाइप -2 मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी कार्य करतात. मधुमेह असलेल्या रुग्णांना हृदय व रक्तवाहिन्यांचा धोका जास्त असतो. आपण बदामा खाण्यासाठी रात्रभर भिजवून ठेवू शकता आणि सकाळी खाऊ शकतात. अभ्यासामध्ये, एका गटास सलग तीन महिने 56 ग्रॅम बदाम खाण्यास देण्यात आले.

दुसर्‍या गटाने स्नॅक्स म्हणून बदाम खाल्ले. या अभ्यासात असे दिसून आले आहे की, दोन्ही गटांच्या कॅलरीजमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, आपण एका दिवसात 8 बदाम खाऊ शकता. बदामांमध्ये लिपिड असतात. जे बेड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजाराविरूद्ध लढायला मदत करतात.

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!

Hair Care | केसांची निगा राखण्यासाठी सोनम कपूरच्या टिप्स, तुम्हीही एकदा ट्राय करून पाहा!

(Eating almonds reduces the risk of diabetes and cholesterol)