Health Care : दररोज केळी खाण्याचे जबरदस्त फायदे, हे आजार राहतील कायमचे दूर!
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, केळीला सुपरफूड (Superfood) असे म्हटले जाते. केळीचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश केला तर अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात. विशेष म्हणजे आपण केळीचा (Bananas) शेक तयार करून देखील आहारामध्ये घेऊ शकतो.
केळी खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर
Image Credit source: TV9
Follow us on
मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, केळीला सुपरफूड (Superfood) असे म्हटले जाते. केळीचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश केला तर अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात. विशेष म्हणजे आपण केळीचा (Bananas) शेक तयार करून देखील आहारामध्ये घेऊ शकतो. हे स्वादिष्ट असण्यासोबतच खूप पौष्टिक आहे. केळीची सर्वात मोठी खासियत म्हणजे केळी हे असे फळ आहे, जे बाराही महिने आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध मिळते. त्याची किंमतही अत्यंत कमी असते कोणीही केळीची घरेदी करू शकते. केळीमध्ये व्हिटॅमिन (Vitamins)-ए, बी, सी, बी6, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे पोषक असतात. चला तर केळीचा दररोजच्या आहारामध्ये समावेश करण्याचे फायदे बघूयात.
वाचा केळी खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे!
केळीमुळे आतडे निरोगी राहतात. हे कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित करते. केळी जळजळ कमी करते. यामध्ये असलेले फायबर पोट निरोगी ठेवते. यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. यामुळे आपण अस्वस्थ खाण्यापासून वाचू शकतो. यामुळेच केळीचा दररोजच्या आहारामध्ये समावेश करा.
केळ्यामध्ये पोटॅशियम असते. त्यामुळे हृदय निरोगी राहते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. हे स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित इतर समस्या दूर करण्यासही मदत करते.
केळ्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे तत्व असते. यामुळे शरीरात सेरोटोनिन तयार होते. त्यामुळे तणाव दूर होण्यास मदत होते. सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये ताण-तणाव खूप जास्त वाढला आहे. केळीची सेवन करून आपण ताण दूर करू शकतो.
कमजोरी दूर करण्यासाठी
केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. यामुळे तुमचे पोट लवकर भरते. नाश्त्यात केळी खाऊ शकता. कधीकधी घाईमुळे नाश्ता चुकतो. अशावेळी तुम्ही केळीचे सेवन करू शकता. त्यातून तुम्हाला ऊर्जा मिळते. हे तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत करते.
हाडे निरोगी ठेवतात
केळ्यामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असते. हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. हे हाडे मजबूत करण्याचे काम करते. त्यामुळे हाडांची समस्या दूर होते. जर सतत तुम्ही एक महिना केळीचा आहारात मसावेश केला तर हाडे दुखणे बंद होईल.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)