मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात आपल्या आहारामध्ये काकडीचा समावेश करणे अधिक फायदेशीर आहे. काकडीत 90 टक्के पाणी असते. हे तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड (Hydrated) ठेवते. उन्हाळ्याच्या दिवसातही ते तुम्हाला थंड ठेवते. तुम्ही याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. काकडी (Cucumber) सलाड म्हणून, काकडीचा रस आणि काकडीचे पराठे देखील तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता. काकडीचे पराठे घरच्या-घरी करण्यासाठी देखील खूप जास्त सोपे आहेत. काही मिनिटांमध्ये एकदम झटपट आपण काकडीचे पराठे तयार करू शकतो. चला तर जाणून घेऊयात काकडीच्या पराठ्यांची रेसिपी.
1 कप किसलेली काकडी, 2 कप गव्हाचे पीठ, तूप, मीठ,1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून आले लसूण पेस्ट, कोथिंबीर, हिंग हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे.
सर्वात अगोदर काकडी सोलून किसून घ्या. एका मोठ्या भांड्यात थोडे गव्हाचे पीठ आणि किसलेली काकडी मिक्स करून घ्या. मीठ, हिंग, जिरे, लाल तिखट, आले लसूण पेस्ट आणि कोथिंबीर देखील त्यामध्ये आता मिक्स करा. हे पीठ 15 मिनिटे बाजूला ठेवा. आता पराठे लाटण्यास सुरूवात करा. गरम तव्यावर पराठा ठेवून दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्या. आवश्यकतेनुसार तूप लावा. दह्यासोबत गरमागरम सर्व्ह करा.
काकडीत अनेक पोषक घटक असतात. त्यात क जीवनसत्त्वे असते. पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, फ्लेव्होनॉइड्स, अँटिऑक्सिडंट्स आणि फॅ न्यूट्रिएंट्स असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे, त्यांनी तर या काकडीच्या पराठ्यांचे दररोज सेवन करायला हवेच.
संबंधित बातम्या :
Health care : या 5 पदार्थांमुळे आतड्यातील अल्सरचा धोका वाढतो, जाणून घ्या या पदार्थांबद्दल!
Health Care : निरोगी राहण्यासाठी फक्त या 4 टिप्स फाॅलो करा आणि पाहा बदल!